Amravati Car Accident : अमरावतीमध्ये कार २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

20
Amravati Car Accident : अमरावतीमध्ये कार २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

अमरावती चिखलदरा मार्गावर आज (रविवार, १७ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास एक (Amravati Car Accident) भीषण अपघात झाला. या अपघातात अर्टिगा गाडी थेट २०० फूट दरीत कोसळली. या अपघातात आठ पैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. परतवाडा ते चिखलदरा या मार्गावरील मोथा गावाजवळ चारचाकी खोल दरीत कोसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे आठ जण आदीलाबाद येथील रहिवासी असून ते पर्यटनासाठी चिखलदरा (Amravati Car Accident) येथे आले होते. सध्या चिखलदारा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे. या अपघातात अर्टिगा वाहन क्रमांक एपी २८ डीडब्ल्यू २११९ या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

(हेही वाचा – New Parliament Building : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या संसद भवनाच्या इमारतीवर उपराष्ट्रपतींनी फडकवला तिरंगा)

सध्या घटनास्थळी (Amravati Car Accident) मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू करण्यात आले असून, या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भरधाव कार अनियंत्रित झाल्यामुळे ती दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.