Air Marshal Makarand Ranade : एअर मार्शल मकरंद रानडे हवाई दलाचे नवे महासंचालक

Air Marshal Makarand Ranade : आताच्या नियुक्तीपूर्वी मकरंद रानडे हे नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

402
Air Marshal Makarand Ranade : एअर मार्शल मकरंद रानडे हवाई दलाचे नवे महासंचालक
Air Marshal Makarand Ranade : एअर मार्शल मकरंद रानडे हवाई दलाचे नवे महासंचालक

एअर मार्शल मकरंद रानडे (Air Marshal Makarand Ranade) यांची 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल (air force) मुख्यालयात निरीक्षण, तसेच सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी (डीजी (आय अँड एस)) नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय (National Defense College), तसेच फ्रान्सचे कॉलेज इंटरआर्मी द डिफेन्स या शिक्षणसंस्थांमधून शिक्षण घेतलेले एअर मार्शल मकरंद रानडे यांनी 6 डिसेंबर 1986 पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागातून सेवेला सुरुवात केली. एकूण 36 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत एअर मार्शल मकरंद रानडे (Makarand Ranade) यांनी अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये, तसेच पदांवर काम केले.

(हेही वाचा – Ajit Pawar vs Sharad Pawar : राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं”अजित पवारांचा खळबळजनक आरोप)

विविध पदांवर अनुभव

लढाऊ विमानांच्या तुकडीचे, तसेच दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून केलेल्या कार्याचा समावेश आहे. रणनीती तसेच हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. काबुल, तसेच अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये (Indian Embassy in Afghanistan) त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे.

हवाई दलाच्या मुख्यालयात नेमणूक झालेली असतांना त्यांनी संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे साहाय्यक प्रमुख या पदांवर काम केले आहे. आताच्या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या (Western Air Command) मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

(हेही वाचा – India-Pakistan Basmati Rice IP Dispute : ‘सुपर बासमती’ तांदूळ भारताचाच; दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका)

एअर मार्शल मकरंद रानडे (Air Marshal Makarand Ranade) यांना वर्ष 2006 मध्ये वायू सेना (शौर्य) पदक, तसेच वर्ष 2020 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते. एअर मार्शल संजीव कपूर (Air Marshal Sanjeev Kapoor) हे हवाई दलात 38 वर्षांचा प्रतिष्ठित सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.