chetan singh :आरोपी सिंह यांची नार्को टेस्टची परवानगी न्यायालयाने नाकारली

जयपूर -मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण

144
आरोपी सिंह यांची नार्को टेस्टची परवानगी न्यायालयाने नाकारली
आरोपी सिंह यांची नार्को टेस्टची परवानगी न्यायालयाने नाकारली

जयपूर -मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (jaipur-mumbai superfast express) चार जणांना गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप असलेला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) कॉन्स्टेबल चेतन सिंह chetan singh याची नार्को विश्लेषण, ब्रेन मॅपिंग आणि पॉलीग्राफ चाचणी करण्याची रेल्वे पोलिसांची (जीआरपी) याचिका बोरिवली येथील दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली आहे.
दरम्यान न्यायालयाने सिंह याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच, आरपीएफने गोळीबाराच्या घटनेची अंतर्गत चौकशी करत असल्याने सिंह यांची न्यायालयीन कोठडीत चौकशी करण्याची परवानगी मागणारी याचिका न्यायालयासमोर दाखल केली, या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

चेतन सिंह chetan singh याने कुठल्या मनस्थितीत हा गोळीबार केला तसेच विभागात अंतर्गत काही त्रुटी आहे का, ते शोधणे हा त्या मागचा उद्देश असल्याने आरपीएफ ने याचिकेत स्पष्ट केले आहे. आरपीएफने ७० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. सूत्रांनी सांगितले की दोन्ही सुरक्षा संस्था – जीआरपी आणि आरपीएफ अद्याप प्रत्यक्ष गोळीबार पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा शोध घेऊ शकलेले नाहीत. आतापर्यंत समोर आलेल्या साक्षीदारांनी गोळीबारनंतर घडलेल्या घटनांची माहिती दे आहे.काही साक्षीदारांचे फोन नंबर एकतर चुकीचे आहेत किंवा ते बंद आहेत आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकलो नाही. तसेच काही साक्षीदार कामासाठी मुंबईबाहेर गेले आहेत, असे बोरिवली रेल्वे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात म्हटले आहे.

(हेही वाचा : ‘माझा टॅक्सी ड्रायव्हर नोकरीपेक्षा गाडी चालवून जास्त पैसे मिळवतो,’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल)
नार्को विश्लेषण करण्यापूर्वी संशयितांची संमती घेणे बंधनकारक आहे. रेल्वे पोलिसांनी आपल्या रिमांड अर्जात नमूद केले आहे की, त्यांनी ते मिळवले होते. सिंग यांची स्वाक्षरी, त्यांची संमती दर्शवते. नार्को विश्लेषण आणि ब्रेन मॅपिंग पूर्ण होईपर्यंत सिंग यांना न्यायालयीन कोठडीत इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.
परंतु जेव्हा न्यायालयाने सिंग यांना विचारले की त्यांनी चाचण्यांसाठी संमती दिली आहे का, तेव्हा त्यांनी ते नाकारले आणि सांगितले की त्यांची स्वाक्षरी जबरदस्तीने घेण्यात आली होती.

हेही पहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.