Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाला सायबर पोलिसांकडून समन्स, प्ले बेटिंग अॅप प्रकरणात २९ एप्रिलला नोंदवणार जबाब

सुनील शेट्टी, संजय दत्त यांच्यासह सुमारे ४० कलाकारांनी या अॅपची जाहिरात केली. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे.

123
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाला सायबर पोलिसांकडून समन्स, प्ले बेटिंग अॅप प्रकरणात २९ एप्रिलला नोंदवणार जबाब

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ‘फेअर प्ले बेटिंग अॅप’ साक्षीदार म्हणून २९ एप्रिलला जबाब नोंदवण्यासाठी तिला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. (Tamannaah Bhatia)

महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी फेअर प्ले अॅपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला होता. तक्रारदार वायकॉम १८ नेटवर्क कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते, पण फेअर प्ले नावाच्या अॅपवर बेकायदेशीररित्या सामन्यांचे प्रसारण केल्याचा आरोप आहे. तमन्नाने याची जाहिरात केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तिला सोमवार, (२९ एप्रिल) चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

फेअर प्लेच्या जाहिरातीसाठी तिच्याशी कोणी संपर्क साधला होता आणि त्यासाठी तिला किती पैसे मिळाले, यासंदर्भात तिची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अनेकांचा हात असल्याचा संशय असून, चौकशी सुरू आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ‘तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज’, मोदींनी केलं युवा आणि महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन)

नेमके काय आहे प्रकरण?
वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत, मात्र फेअर प्ले या अॅपवर सामन्यांचे बेकायदा प्रक्षेपण केल्याचा आरोप आहे. सुनील शेट्टी, संजय दत्त यांच्यासह सुमारे ४० कलाकारांनी या अॅपची जाहिरात केली. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने फेअर प्ले अॅपविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर आता ईडीनेही याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.