Pune : वेताळ टेकडीवर आढळल्या २ नशेबाज विद्यार्थिनी, अभिनेते रमेश परदेशींनी व्हायरल केला व्हिडियो

292
Pune : वेताळ टेकडीवर आढळल्या २ नशेबाज विद्यार्थिनी, अभिनेते रमेश परदेशींनी व्हायरल केला व्हिडियो
Pune : वेताळ टेकडीवर आढळल्या २ नशेबाज विद्यार्थिनी, अभिनेते रमेश परदेशींनी व्हायरल केला व्हिडियो

पुण्यातील कोथरुड येथील वेताळ टेकडीवर वॉकला गेलेले अभिनेते रमेश परदेशी यांनी एक विचित्र प्रसंग पाहिला. त्यांना दोन विद्यार्थिनी नशेत असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच फेसबुक लाईव्हद्वारे व्हिडियो व्हायरल करून ही खळबळजनक घटना उघडकीस आणली. त्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडियोमध्ये दोन विद्यार्थिनी नशेत असल्याचे दिसत आहे. नशेमध्ये असणाऱ्या या विद्यार्थिनी अल्पवयीन आहेत. त्यांना त्यांनी रुग्णालयात दाखल केलं, अशी माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दिली आहे.

नशामुक्त महाराष्ट्र (ड्रग फ्री महाराष्ट्र) अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलीस आयुक्तालयात करून अमली पदार्थ विक्री आणि तस्करांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा प्रसंग घडला. याबाबत पुणे पोलिसांत त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांमध्ये १८०० किलो ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ हजार कोटी रुपये आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतरच अभिनेते रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्हद्वारे वेताळ टेकडीवर फिरायला गेलेले असताना घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडियो व्हायरल केला. या धक्कादायक घटनांमुळे खळबळ उडाली आहे. ‘नशेत असणाऱ्या दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी एका मुलीची प्रकृती ठीक आहे, तर दुसरीची प्रकृती आता सुधारत आहे, अशी माहिती परदेशी यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde: कायद्यापेक्षा स्वत:ला मोठे समजू नका; मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना सुनावले)

परदेशी यांनी व्यक्त केलं मत
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता या दोन्ही मुली साताऱ्यात राहणाऱ्या असून महाविद्यात पहिल्या वर्षाला शिकत आहेत. त्या नशेत टेकडीवर एका कोपऱ्यात पडल्या होत्या, अशी माहिती मिळाल्याचंही रमेश परदेशी यांनी सांगितलं. माझ्या घरातही एवढीच मुलगी आहे, माझ्या मुलीने असं केलं तर मी कुणाकडे बघायचं? हे पाहून मला घाबरायला होतं, प्रत्येक पुणेकराने या घटनेबाबत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. हा विषय गंभीर आहे, असं मतही याबाबत परदेशी यांनी व्यक्त केलं आहे.

मेफेड्रोन तस्करीचा प्रकार तपासात उघडकीस
पुणे पोलिसांनी मेफेड्रोन तस्करीचा प्रकार नुकताच उघडकीस आणला. पुणे, दिल्ली, सांगलीत छापा टाकून पोलिसांनी तीन हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक करण्यासाठी फडणवीस शनिवारी पोलीस आयुक्तालयात आले होते. फडणवीस यांनी पोलिसांच्या पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी सातजणांना अटक केली. पुण्यातील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतून देश-परदेशात मेफेड्रोन तस्करीचा प्रकार तपासात उघडकीस आला. शहरातील अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.