Devendra Fadnavis: जरांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी केला पलटवार; कायदा पाळला नाही, तर कारवाई निश्चित

फडणवीस म्हणाले की, मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयातसुद्धा टिकवलं. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल, असं म्हणणारा मी नाही.

238
Devendra Fadnavis: जरांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी केला पलटवार; कायदा पाळला नाही, तर कारवाई निश्चित
Devendra Fadnavis: जरांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी केला पलटवार; कायदा पाळला नाही, तर कारवाई निश्चित

सागर बंगला सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही, मात्र कोणत्या निराशेतून जरांगे ते बोलत आहेत, कोणाला सहानुभूती हवी आहे ते माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांनासुद्धा माहीत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

फडणवीस म्हणाले की, मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयातसुद्धा टिकवलं. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल, असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत होते तीच स्क्रिप्ट जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. याचा काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – Advocate Gunaratna Sadavarte: ‘यामागे राजकीय हेतू…लोकांना पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचा डाव’, वकील सदावर्तेंनी केली ‘ही’ मागणी )

जरांगेंची आक्रमक भूमिका…
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, अशी प्रतिक्रियाही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली. प्रत्येक ठिकाणी सरकारचं मदतीचं धोरण आहे. राज्यात गुंतवणूकदेखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली तसेच कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेल्या फडणवीस यांनी सातारा दौऱ्यातून तातडीने मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, तर मनोज जरांगेंनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला आहे. जरांगे आंतरवाली सराटीमधून निघाले आहेत. भांबेरी गावाजवळ आल्यानंतर जरांगे यांचा ताफा लोकांनी अडवला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.