Petrol Diesel Theft Racket उध्वस्त, चार टँकर्ससह ८९ लाखांचे पेट्रोलियम पदार्थ जप्त

पेट्रोल डिझेल चोरी करणारे एक मोठे रॅकेट असून चोरी करणारे हे डिझेल पेट्रोल ६० रुपये लिटरप्रमाणे त्यांची विक्री ट्रॅक चालक तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना केली जाते.

102
Petrol Diesel Theft Racket उध्वस्त, चार टँकर्ससह ८९ लाखांचे पेट्रोलियम पदार्थ जप्त

दररोज हजारो लिटरची पेट्रोल डिझेलची होणारी चोरी वडाळा येथे पकडण्यात आली आहे. वडाळा पोलिसांनी शिधावाटप अधिकाऱ्यांच्या मदतीने ४ टँकर्ससह ८९ लाख रुपयांचे पेट्रोलियम पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. (Petrol Diesel Theft Racket)

मुंबईतील वडाळा, चेंबूर येथील पेट्रोलियम पदार्थाचे आगार असून या आगारातून दिवसाला हजारो लिटर पेट्रोलियम पदार्थ पुरवठा केला जातो. या आगारातून पेट्रोलियम पदार्थ वाहून घेऊन जाणाऱ्या टँकरमधून चालक आणि क्लिनरच्या मदतीने टँकरमधून दिवसाला हजारो लिटर पेट्रोल डिझेल चोरी (Petrol Diesel Theft Racket) करणारे रॅकेट अस्तित्वात असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रण विभागाला मिळाली होती. या दरम्यान परिसरातील शिधावाटप अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पाळत ठेवून वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी टँकरमधून बादली आणि पाईपच्या साहाय्याने डिझेलची चोरी करीत असल्याचे आढळून आले. (Petrol Diesel Theft Racket)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईत, शेवाळेंना धारावीचे मैदान खुले)

४ टँकर्ससह हजारो लिटर पेट्रोलियम पदार्थ जप्त

शिधावाटप अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला असता पेट्रोल डिझेलची चोरी करताना दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून इतर डिझेल चोरांनी पळ काढला. या प्रकरणी शिधावाटप अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांची मदत मागितली. वडाळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता हे दोघे क्लिनर आणि टँकर ड्रायव्हर असल्याची माहिती त्यांनी दिली. (Petrol Diesel Theft Racket)

पोलिसांनी पेट्रोल डिझेल चोरी करताना ४ टँकर्ससह हजारो लिटर पेट्रोलियम पदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले टँकर्स आणि पेट्रोलची किंमत ८९ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पेट्रोल डिझेल चोरीचा हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. पेट्रोल डिझेल चोरी करणारे एक मोठे रॅकेट (Petrol Diesel Theft Racket) असून चोरी करणारे हे डिझेल पेट्रोल ६० रुपये लिटरप्रमाणे त्यांची विक्री ट्रॅक चालक तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना केली जाते. हे रॅकेट पेट्रोलियम कंपनीच्या टँकर चालक आणि क्लिनर यांना हाताशी धरून टँकर्समधून दिवसाला हजारो लिटर पेट्रोल डिझेलची चोरी करतात अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Petrol Diesel Theft Racket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.