Water Cut : कांदिवली आणि बोरीवलीत ‘या’ दिवशी असेल पाणीकपात

कांदिवली (पश्चिम) येथे वसंत संकूल समोर, नवीन जोडरस्‍ता आणि बोरसापडा मार्ग जंक्शन येथे १२०० मिलीमीटर x १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवार २ मे २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे.

156
Water Cut : पश्चिम उपनगरातील 'या' भागात राहणार पाणीबाणी; १६ तासांचा वॉटर ब्लॉक

कांदिवलीतील मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्‍त्‍यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत गुरुवारी २ मे २०२४ रोजी रात्री १० वाजल्यापासून २४ तासांकरिता जलवाहिनी स्वतंत्र केले जाणार आहे. त्‍यामुळे गुरुवारी २ मे २०२४ रोजी रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी ३ मे २०२४ रोजी रात्री १० वाजल्यापर्यंत कांदिवली आणि बोरीवलीतील काही परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Water Cut)

कांदिवली (पश्चिम) येथे वसंत संकूल समोर, नवीन जोडरस्‍ता आणि बोरसापडा मार्ग जंक्शन येथे १२०० मिलीमीटर x १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवार २ मे २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी बदलण्‍याचे काम झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. (Water Cut)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरेंचा मूळ जाहीरनामा काँग्रेसचाच; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल)

या विभागात राहणार पाणीकपात

आर दक्षिण विभाग : जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री १.३० ते मध्यरात्री २.५५) – दिनांक ३ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील (दिनांक २ मे २०२४ मध्य रात्रीनंतर)

आर दक्षिण विभाग : लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, गांधी नगर, संजय नगर, बंदर पखाडी, भाबरेकर नगर, सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ३.४० ते पहाटे ५.५०) – दिनांक ३ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

आर दक्षिण विभाग : म्हाडा एकता नगर, महावीर नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्‍वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ११.००) – दिनांक ३ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

आर दक्षिण व आर मध्य विभाग : चारकोप म्हाडा (सेक्टर – ०१ ते ०९) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ११.४५ ते दुपारी २.०५) – दिनांक ३ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

आर दक्षिण विभाग : पोईसर, महावीर नगर, इंदिरा नगर, बोरसापाडा मार्ग, स्‍वामी विवेकानंद मार्ग. (Water Cut)

(दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.४५) – दिनांक ३ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

आर मध्‍य विभाग : शिंपोली, महावीर नगर, सत्या नगर, वझिरा नाका, बाभई, जयराज नगर, एक्सर, सोडावाला गल्ली, योगी नगर, रोकडिया गल्ली, सरदार वल्‍लभभाई पटेल मार्ग, पोईसर व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्‍वामी विवेकानंद मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ०७.१० ते रात्री ०९.५५) – दिनांक ३ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.