राष्ट्रवादीचे नेते Nawab Malik पुन्हा तुरुंगात जाणार?; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पीएमएलए कोर्टाचा दणका

Nawab Malik :       राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाण्याची शक्यता आहे.(Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना मोठा झटका दिला आहे.

135

Nawab Malik :       राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाण्याची शक्यता आहे.(Nawab Malik) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना मोठा झटका दिला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या डी-कंपनीसोबत कनेक्शन समोर आले आहे. पीएमएलए कोर्टाच्या निकालानंतर राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.(Nawab Malik)

(हेही वाचा Bandra Fort वरील कार्यक्रमात मी उपस्थित होतो परंतु मद्यविक्रीला परवानगी दिली नव्हती-आशिष शेलार )

दरम्यान, विशेष पीएमएलए कोर्टात मलिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यांच्या कंपनीने दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक त्यांच्या कंपनीने दाखल केलेली निर्दोष मुक्तता याचिका फेटाळून लावली आहे.(Nawab Malik)

न्यायालयाने १८ नोव्हेंबरला आरोप निश्चित करताना सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेशही दिले आहेत. या निर्णयानंतर, नवाब मलिक न्यायालयात हजर राहणार आहेत. नवाब मलिक यांच्या कंपनी, मलिक इन्फ्रास्ट्रक्चरने ही निर्दोष मुक्तता याचिका दाखल केली होती. ईडीचा संपूर्ण खटला अनुमानांवर आधारित आहे, कारण कथित बेकायदेशीर व्यवहार झाला तेव्हा डी-कंपनी अस्तित्वात नव्हती, असे मलिक यांच्या कंपनीने म्हटले आहे.(Nawab Malik)

 

न्यायालयाने काय म्हटले?

नवाब मलिक यांच्या कंपनीचा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात पुरेसे प्राथमिक पुरावे उपलब्ध आहेत. न्यायालयाने म्हटले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, नवाब मलिक यांनी हसीना पारकर, सलीम पटेलडी-कंपनीशी संबंधित आरोपी सरदार खान यांच्यासोबत कुर्ला येथे बेकायदेशीरपणे एक मौल्यवान जमीन मिळविली. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगद्वारे ती कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला. या भूखंडात १६ कोटी रुपयांच्या गुन्ह्यातून मिळालेली रक्कम असल्याचे सांगण्यात आले.(Nawab Malik)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.