Muslim : मीरा रोडपाठोपाठ पनवेलमध्येही धर्मांध मुसलमानांकडून रामभक्तांच्या शोभायात्रेवर हल्ला; तीन रामभक्त जखमी

1502
अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार म्हणून देशभरात हिंदू विविध ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र मुंबईतील मीरा रोड येथील नया नगर येथे धर्मांध मुसलमानांनी (Muslim) या शोभायात्रेवर मोठ्या संख्येने येऊन हल्ला केला. दगडफेक केली, लाठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर पनवेल येथेही असेच धर्मांध मुसलमानांनी (Muslim) शोभायात्रेवर हल्ला केल्याचे वृत्त आले आहे.

हल्ल्यात तिघेजण जखमी

सोमवारी संध्याकाळी पनवेलमध्ये श्रीराम बाईक रॅली दरम्यान धर्मांध मुसलमानांनी (Muslim) हल्ला केला. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त देशभरात विवीध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. पनवेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे रुपेश पाटील यांनी श्रीराम बाईक रॅलीचे आयोजन केले होते.  खारघरहुन पनवेलच्या दिशेने रॅली जात असताना पनवेल मोहल्ला दरम्यान रॅली पोहचली असताना पाठीमागून धर्मांध मुसलमानांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन रामभक्त जखमी झाले असून त्यांच्या डोके आणि पाठीवर वार झाला. तसेच या राड्यामध्ये इनोव्हा, फॉर्चूनर कार आणि दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.