मीरा रोडमधील मुसलमानांच्या डोळ्यांत Shri Ram Mandir खुपले; रामभक्तांच्या शोभायात्रेवर धर्मांधांची दगडफेक, लाठ्या काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला

1298
Muslim वस्त्यांमध्ये अफवांचे मेसेज व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
Muslim वस्त्यांमध्ये अफवांचे मेसेज व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
अयोध्येतील श्रीराम मंदिरात (Shri Ram Mandir) श्रीरामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मीरा रोड नया नगर येथे शोभायात्रेचे आयोजन केले होते. देशभरात उत्सव साजरा केला जात असताना तसा मीरा रोड येथेही रामभक्तांनी उत्सव साजरा केला. त्यासाठी रविवार, २१ जानेवारी रोजी शोभायात्रेचे आयोजन केले होते. मात्र त्याचवेळी ५० ते ६० जणांच्या धर्मांध मुसलमानांनी शोभायात्रेवर दगडफेक केली. त्यानंतर सोमवारी, २२ जानेवारी रोजी यंकाळी निघालेल्या शोभायात्रेवरही धर्मांध मुसलमानांनी पुन्हा दगडफेक केली. या घटनेनंतर मीरा भाईंदर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या घटनेनंतर मीरा भाईंदर शहराला पोलीस छावणीचे रूप आले आहे. दरम्यान रविवारी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सोमवारी दिवसभरात २२ जणांची धरपकड करण्यात आली असून १४ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लाठ्या काठ्या, रॉडने हल्ला

अयोध्येतील श्रीराम मंदिरात (Shri Ram Mandir) श्रीरामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी अक्षरशः शोभायात्रेतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर लाठ्या काठ्या, रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक रामभक्त हिंदू जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. जखमींमध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित  धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मध्यरात्री नया नगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे तसेच हत्येचा प्रयत्न करणे अशा विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिवसभरात हल्लेखोरांची धरपकड करून २२ जणांना ताब्यात घेतले होते, त्यापैकी रात्री उशिरापर्यत १४  जणांना अटक करण्यात आली आहे.

शेकडोच्या संख्येने धर्मांध मुसलमान उतरले रस्त्यावर

मीरा भाईंदरमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण असताना रविवारी झालेल्या घटनेची सोमवारी सांयकाळी पुनरावृत्ती झाली. रात्रीच्या दगडफेकीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत होत्या. सायंकाळी नया नगर परिसरात पुन्हा शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. शेकडोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते. मीरा रोड येथील नया नगर भागात झालेल्या वादानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून तेथून शोभायात्रा काढण्यास सक्त मनाई केली. मात्र नया नगर भागात जाण्यासाठी गोल्डन चौकात जमलेल्या जमावाने संतप्त होऊन जवळील टेम्पो नाक्यावर तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची तोडफोड केली. यामुळे वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून बंदोबस्तात वाढ केली. पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे हे जातीने घटनास्थळी हजर होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत होते. नागरिकांनी संयम बाळगावा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केले.

चित्रा वाघ पीडितेच्या भेटीला

रविवारी मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात भाईंदर पश्चिम येथे राहणारी एक महिला देखील जखमी झाली होती. या महिलेची भेट घेण्यासाठी भाजप महिला प्रदेश नेत्या चित्रा वाघ या माजी आमदार नरेंद्र मेहतासोबत पीडितेच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलेची विचारपूस करून दोषींवर कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल, असे आश्वासन दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.