Mumbai : लोकल प्रवासात महिलेला बेल्टने मारहाण; वडाळ्यातून आरोपी गजाआड; अंधेरी रेल्वे पोलिसांची कारवाई

74
Mumbai local train incident showing a man assaulting a woman.
Mumbai : लोकल प्रवासात महिलेला बेल्टने मारहाण; वडाळ्यातून आरोपी गजाआड; अंधेरी रेल्वे पोलिसांची कारवाई
  • प्रतिनिधी

Mumbai            मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, अंधेरी रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला वडाळा परिसरातून अटक केली आहे. (Mumbai)

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता हार्बर लाईनवरील गोरेगाव ते सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली. संबंधित महिला आधीच ट्रेनमध्ये प्रवास करत असून एका सीटवर झोपली होती. ट्रेन जोगेश्वरी स्थानकावर पोहोचल्यानंतर आरोपी लोकलमध्ये चढला आणि त्याने महिलेला उठून बसण्यास सांगितले. (Mumbai)

(हेही वाचा – “आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय…”; गुजरातवरुन आलेल्या तरुणांचं Abhijit Dipke च्या घराबाहेर आंदोलन)

यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला, जो अंधेरी स्थानकापर्यंत चालला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने हाताने आणि बेल्टने महिलेला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ डब्यात असलेल्या एका अन्य प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओमध्ये डब्यात इतर प्रवासी उपस्थित असल्याचे दिसत असूनही कोणीही आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Mumbai)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेतला आणि वडाळ्यातून त्याला बेड्या ठोकल्या. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. (Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.