छोटा शकीलचा शूटर लईक अहमद फिदा हुसैन शेख २५ वर्षांनंतर गजाआड

शेखने आपल्या साथीदाराच्या मदतीने गँगस्टर मुन्ना धारी याची २ एप्रिल १९९७ रोजी हत्या केली होती.

114
छोटा शकीलचा शूटर लईक अहमद फिदा हुसैन शेख २५ वर्षांनंतर गजाआड

गँगस्टर छोटा शकीलचा शूटर लईक अहमद फिदा हुसैन शेखला मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे. गँगस्टर मुन्ना धारीच्या हत्येप्रकरणात पोलीस त्याच्या शोधात होती. तब्बल २५ वर्षानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे. पायधुनी पोलिसांनी २८ जुलै रोजी या शूटरला ठाणे रेल्वे स्थानकाजवळ अटक केली.

(हेही वाचा – Terrorists : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर ‘चाबड हाऊस’?; पोलीस यंत्रणा सतर्क)

शूटर शेखने आपल्या साथीदाराच्या मदतीने गँगस्टर मुन्ना धारी याची २ एप्रिल १९९७ रोजी हत्या केली होती. मुन्ना धारी हा छोटा राजन टोळीचा सदस्य होता. त्यावेळी पोलिसांनी लईक अहमद फिदा हुसैन शेखविरुद्ध भादंवि कलम 302, 34 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल केला होता. यानंतर १९९८ मध्ये न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. जामिनावर सुटल्यानंतर शेख भूमिगत झाला होता.

शेख कोणत्याही न्यायालयीन सुनावणीत हजर झाला नसल्याने त्याला फरारी घोषित करण्यात आले. त्यामुळे तब्बल २५ वर्षे तो फरार होता. परंतु पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान शेख हा मुंब्रा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा येथे शोध मोहीम राबवली. परंतु तो तेथे सापडला नाही. विशेष म्हणजे त्याला कोणी ओळखू शकले नाही. शेख हा ठाणे शहरात टॅक्सी चालवण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचत त्याला रेल्वे स्थानकावरून अटक केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.