बालकांचे लसीकरण नोंदणीसाठी ‘या’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन

126
बालकांचे लसीकरण नोंदणीसाठी 'या' ॲपचा वापर करण्याचे आवाहन
बालकांचे लसीकरण नोंदणीसाठी 'या' ॲपचा वापर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील एकही बालक लसीकरण विना राहू नये व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ”यू विन ॲप”वर नोंद केल्यानंतर बालकांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी १२ व १८ जुलै २०२३ रोजी प्रशिक्षण वर्ग झाला. या मोहिमेचे प्रथम फेरी ७ ऑगस्ट २०२३ ते १२ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू होणार आहे.

कोरोनामध्ये लसीकरणानंतर नोंद केलेल्या नागरिकांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त होत होता. त्याच धर्तीवर आता बालकांच्या विविध प्रकारच्या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईलवर ”यू विन पोर्टल”द्वारे संदेश येईल. लसीकरणाशी संबंधित सर्व तपशिलांची नोंद पोर्टल वर केली जाईल. लाभार्थ्यास कोणत्याही राज्यात अथवा जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. या पोर्टलच्या माध्यमातून एका क्लिकवर लसीकरणाशी संबंधित माहिती मिळेल.

(हेही वाचा – मुंबईतील प्रकल्प रस्त्यांवरच घडतेय अधिक खड्डे दर्शन)

महत्त्वपूर्ण

या प्रणालीसाठी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर बालकांचे लसीकरण करण्यासाठी जाताना पालकांनी ”यू विन ॲप”वर नोंदणीसाठी मातेचे आधारकार्ड, आधारकार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. या प्रणालीद्वारे लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचीही गरज राहणार नाही. मोबाईलवरील मेसेजद्वारे समजू शकणार आहेत.

या ॲपमध्ये लाभार्थी स्वतः नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहेत. तसेच लसीकरण लाभार्थ्यांचे आशा व ए. एन. एम/एमपीडब्ल्यू सुद्धा पुर्व नोंदणी करू शकणार आहेत. लसीकरणादिवशी ही लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.

”यू विन ॲप”चा वापर करून जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसीकरण वेळेत होण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.