Mumbai Crime : मुले चोरणाऱ्या टोळीला अटक, २ वर्षाच्या मुलीची सुटका

70
Mumbai Crime : मुले चोरणाऱ्या टोळीला अटक, २ वर्षाच्या मुलीची सुटका
Mumbai Crime : मुले चोरणाऱ्या टोळीला अटक, २ वर्षाच्या मुलीची सुटका

फुटपाथवर झोपणाऱ्या कुटुंबातील मुले चोरणाऱ्या टोळीला कुरार व्हिलेज पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी मुलांची चोरी करून त्यांचा वापर भीक मागण्यासाठी करीत होती असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पाच जणांच्या या टोळी कडून पोलिसांनी दोन वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. सलाउद्दीन नूर मोहम्मद सय्यद, आदिल सईद खान, इरफान फुरकान खान, तौकीर इक्बाल सय्यद आणि मुन्ना हक तहकीन शेख असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. या टोळीचे आणखी सदस्य मुंबई तसेच इतर परिसरात वावरत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मुले चोरून त्यांची तस्करी करणारे खूप मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीच्या चौकशीत मुंबईतून गायब झालेल्या मुलांचे गूढ उकळण्याची शक्यता आहे. (Mumbai Crime)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालाड पूर्व कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात २६ सप्टेंबर रोजी २ वर्षाच्या मुलीची चोरी झाल्याची तक्रार एका कुटुंबाने दिली होती. हे कुटुंब दिवसभर खेळणी विकून पोटाची खळगी भरतात आणि फुटपाथवर राहतात. २६ सप्टेंबर रोजी हे कुटुंब मालाड येथील टाइम्स ऑफ इंडिया पुलाजवळील फुटपाथवर झोपले होते. पहाटे साडेचार वाजता तक्रारदाराला जाग आली आणि त्यांना त्यांची दोन वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याने, त्याची पत्नी आणि मेहुणीने बाळाचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यानंतर तक्रारदाराने कुरार पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Dadar Station : फुकट्या प्रवाशांवर २०० टीसींचा सर्जिकल स्ट्राइक)

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद सय्यद, सईद खान, फुरकान खान आणि इक्बाल सय्यद या चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी अपहरण केल्याची कबुली दिली आणि पोलिसांना तहकीन शेख, ज्याच्याकडे मुलगी होती त्याला देखील अटक केली. ही टोळी मुले चोरी करून त्यांची तस्करी करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून चोरलेल्या मुलाचा वापर भीक मागणे तसेच गुन्हेगारी कृत्यासाठी करीत असावे अशी शक्यता वर्तवली आहे. या टोळीची कसून चौकशी सुरू असून लवकरच या मुले चोरणाऱ्या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहचू अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.