Shiv Sena Dasara Melava 2023 : शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेतच संभ्रमावस्था, म्हणून घेतली जाईल माघार

48
Shiv Sena Dasara Melava 2023 : शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेतच संभ्रमावस्था, म्हणून घेतली जाईल माघार
Shiv Sena Dasara Melava 2023 : शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेतच संभ्रमावस्था, म्हणून घेतली जाईल माघार

परंपरेनुसार यंदाचा दसरा मेळावा शिवतिर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यासाठी दोन्ही शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या जी-उत्तर विभागात परवानगीसाठी अर्ज सादर केला. मात्र, या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी कोणत्या शिवसेनेच्या गटाला मिळणार याबाबत स्पष्टता नसून यावर न्यायालयातून परवानगीचा मार्ग सोडवला जाण्याची शक्यता वर्तवला जात आहे. शिवतिर्थावर मेळावा घेण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवतिर्थावरील मेळाव्याचा हट्ट न धरता मागील वर्षी प्रमाणे बीकेसीच्या मैदानातच मेळावा आयोजित करण्याची मागणी एका गटाकडून केली जात आहे. त्यामुळे शिवतिर्थाची मागणी करत एकप्रकारे ठाकरेंना मोठे बळ देण्याऐवजी त्या जागेचा हट्ट सोडून शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री हे बीकेसीतील मैदानाला प्राधान्य देण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. (Shiv Sena Dasara Melava 2023)

मागील वर्षी दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्यावतीने अनिल देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्यावतीने आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे शिवतिर्थावर सभा घेण्यास परवानगीसाठी अर्ज केला होता. परंतु पोलिस आणि महापालिकेने शिवसेनेला दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्याकरता परवानगी नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाने शिवसेनेला मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी हिरवा दिवा दाखवला आणि त्याप्रमाणे ठाकरेंची सभा शिवतिर्थावर झाली. तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बीकेसीमध्ये सभा घ्यावी लागली होती. परंतु ही परवानगी नाकारल्याने ठाकरेंना याची अधिक सहानभूती मिळालली आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिवतिर्थावर या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे शिंदे यांनी सरकारी ताकद वापरुन ठाकरेंच्या मेळाव्याची ताकद कमी करण्याच्या प्रयत्नात उलट न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांचे वाढलेले महत्व यंदा वाढवू द्यायचे नाही, असे काहीसे मत आता शिवसेनेकडून व्यक्त केले जात आहे. (Shiv Sena Dasara Melava 2023)

(हेही वाचा – Onion Auction : कांद्याची कोंडी फुटली; कांदा लिलावाला सुरुवात)

मागील वेळेस ठाकरेंना या मेळाव्यासाठी झालेला फायदा भाजपला रुचलेला नाही. त्यामुळे यंदाही या मेळाव्यावरून जास्त विरोध करून त्यांचे महत्व वाढवू द्यायचे. त्याऐवजी शिवसेनेने यंदा शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याच्या मुद्द्याला अधिक ताणू नये अशाच सूचना भाजपनेही केल्याची माहिती मिळत आहे. त्यातच शिवसेनेतील एका गटाचेही बीकेसीत मेळावा घेण्यास एकमत होत आहे. परंतु यंदा अधिकृत शिवसेना आपलीच असून धनुष्यबाणाच्या चिन्हासह आपल्याच पक्षाला मान्यता मिळाल्याने परंपरेनुसार दसरा मेळावा शिवतिर्थावरच व्हावा अशी मागणी एका गटाकडून होत आहे. मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शिवतिर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, दसरा मेळावा शिवतिर्थावर घ्यावा की बीकेसीमध्ये घ्यावा याबाबत पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असे म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता शिवतिर्थावरील दावा अधिक न ताणता बीकेसीमध्ये सभा घेण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता असून त्यादृष्टीकोनातून त्यांनी यंत्रणांना सज्ज राहण्याच्याही सूचना केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवतिर्थावरील परवानगी न्यायालयात जावून पुन्हा ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी मिळाल्यास पुन्हा त्यांचा मेळावा मोठ्याप्रमाणात होईल, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरुन ते अधिक त्वेषाने मैदान उतरतील अशी परिस्थिती निर्माण करू द्यायची नाही म्हणून हा माघार पक्षाचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असेही बोलले जात आहे. (Shiv Sena Dasara Melava 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.