Mumbai AC Local : चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलवर दगडफेक, नेमकं काय घडलं ?

दगडफेकीमुळे कोणत्याही प्रवाशाला जखम किंवा इजा झाली नाही

26
Mumbai AC Local : चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलवर दगडफेक, नेमकं काय घडलं ?
Mumbai AC Local : चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलवर दगडफेक, नेमकं काय घडलं ?

चर्चगेट ते विरारदरम्यान (Mumbai AC Local) जलद धावणाऱ्या एसी लोकलवर समाजकंटाकांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान (Kandivali and Borivali Station) ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

दुपारी तीन वाजून ३८ मिनिटांनी ही घटना घडली असून दगडफेकीत एसी लोकलच्या पाच ते सहा खिडक्यांच्या काचा तुटल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दगडफेकीमुळे कोणत्याही प्रवाशाला जखम किंवा इजा झाली नाही. या घटनेबाबत बोरिवली लोहमार्ग पोलिसांना (Borivali Railway Police) माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

(हेही वाचा – Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.