Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?

82
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केलेल्या भाजपाने प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणांशी जुळवून घेण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे कळते. (Maharashtra BJP)

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षण प्रश्न लावून धरल्यानंतर सरकारसमोर, विशेषतः भाजपासमोर पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात भाजपाने मराठा आरक्षणावरून आरोपांची राळ उठवली होती. तसेच, आपण सत्तेवर आल्यास तातडीने आरक्षण देण्याची घोषणाही केली होती. मात्र, सरकार स्थापन करून दीड वर्षांचा काळ लोटला, तरी अद्याप या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. (Maharashtra BJP)

(हेही वाचा – WhatsApp : तब्बल ७४ लाख व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची खाती केली बंद)

दुसरीकडे, जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसा आरक्षणप्रश्न आणखी चिघळू लागला आहे. त्यामुळे मराठा मतदार दुरावू नयेत, यासाठी भाजपाने वेगळी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय नेतृत्त्वाने तशी सूचना केली आहे. त्यानुसार, प्रदेशाध्यक्षपदी मराठा चेहरा देण्याची तयारी सुरू आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदी संधी देऊन मराठा समाजातील एखादा आश्वासक चेहरा त्यांच्या जागी दिला जाणार आहे. (Maharashtra BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.