Mumbai Crime : दाऊदच्या ‘डी-कंपनी’चे नाव वापरून व्यावसायिकाला धमकी

Mumbai Crime : दाऊदच्या 'डी-कंपनी'चे नाव वापरून व्यावसायिकाला धमकी

61
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
मुंबई

‘डी-कंपनी’च्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्यांच्याकडून घेतलेले १.२५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मागणी केल्या प्रकरणी गुजरातस्थित एका व्यावसायिकावर नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे मीरा रोड परिसरात खळबळ उडाली आहे.(Mumbai Crime)

तक्रारदार अश्वक अबुबकर नवीवाला (५१) हे मीरा रोड येथील हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शफीक पटेल (४५) याने सुमारे पाच वर्षांपूर्वी दुबईमध्ये हॉटेल सुरू करण्यासाठी नवीवाला यांच्याकडून १.२५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. मात्र, अनेक वेळा मागणी करूनही पटेल यांनी ही रक्कम परत केली नाही.(Mumbai Crime)

(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाची विजेतेपदाच्या बचावासाठी दमदार मोहीम )

१४ जून रोजी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास नवीवाला यांना एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण ‘डी-कंपनी’चा सदस्य असल्याचे सांगत, नवीवाला यांना पटेल यांच्याकडून घेतलेले कर्ज विसरून जाण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर, पैशांची मागणी करणे थांबवले नाही, तर स्वतःला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली.(Mumbai Crime)

नवीवाला यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शफीक पटेल आणि त्या अज्ञात कॉलरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे म्हणाले की, “आरोपी पटेल सध्या दुबईमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कॉल ट्रेस करत असून कॉलरचा शोध घेत आहोत. तसेच, पटेल याच्या विरोधात इंटरपोलची ‘रेड कॉर्नर नोटीस’ काढण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.”(Mumbai Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.