Road Accident : राज्यात दरवर्षी सरासरी १५ हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू; राज्यभरात १००० ब्लॅकस्पॉट

163
दरवर्षी १५ हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी घेणाऱ्या राज्यातील सर्वात जास्त रस्ते अपघात (Road Accident) होण्याचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) राज्य वाहतूक पोलिसांकडून निश्चित करण्यात आले आहे. राज्यात असे एकूण १ हजार ४ ब्लॅक स्पॉट असून त्यापैकी २६२ ब्लॅक स्पॉटमधील दोष दूर करण्यात आलेला असला तरी राज्यात अद्यापही ७४२ ब्लॅक स्पॉट (Road Accident) आहे त्याच अवस्थेत असल्याची माहिती महामार्ग पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रत्येक वर्षी १५ हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यु

राज्य महामार्ग पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात २०२१ मध्ये २९ हजार ४७७ अपघात झाले होते, त्यात १३ हजार ५२८ जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच  सन २०२२ मध्ये ३३ हजार ३८३ अपघात झाले (Road Accident) असून या अपघातात १५ हजार २२४ जण मृत्युमुखी पडले आहे.  प्रत्येक वर्षी राज्यात सरासरी ३० हजार  अपघात होत असून १५ हजार पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे जसे अतिवेग, विना हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणे, लेन कटींग इतर कारणांमुळे अपघात होऊन मृत्यु होण्याची संख्या अधिक असल्याचे दिसून आली आहे.

पोलीस घटकांकडून अपघात स्थळांचे विश्लेषण

राज्यात वाढत्या अपघातांचे तसेच दिवसेंदिवस अपघातात मृत्युंची वाढती संख्या पाहता महामार्ग पोलीस विभागाकडुन व पोलीस घटकांकडून अपघात स्थळांचे विश्लेषण करण्यात आले असता २०१९ ते २०२१ या कालावधीत झालेल्या अपघात स्थळाचे विश्लेषण करण्यात आले असता राज्यात १ हजार ४ ठिकाणे अशी आहे की, त्या ठिकाणी सर्वाधिक अपघात (Road Accident) होऊन मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. सततच्या होत असलेल्या अपघातांमुळे नमुद ठिकाणांना ब्लॅकस्पॉट म्हणून सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय (MORT&H), भारत सरकार, नवी दिल्ली यांना माहिती सादर करण्यात आली होती. १ हजार ४ ब्लॅकस्पॉटवर महामार्ग पोलीस विभाग व राज्यातील पोलीस घटकांकडून अग्रणी भुमिका घेऊन या ब्लॅकस्पॉटवर अपघात कमी कसे होतील? अथवा अपघातग्रस्त लोकांचे जीव कसे वाचतील? याबाबत वेळोवेळी अपघातांचे विश्लेषण करण्यात येत असते.

मध्य व दीर्घ मुदतीच्या उपाय योजना

महामार्ग पोलीस विभागाकडुन राष्ट्रीय महामार्ग (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग (MSRDC) तसेच इत्यादी रस्त्यांची देखभाल करणाऱ्या विभागांना अपघातांचा अभिलेख आणि माहिती देवुन त्यावर रम्ब्लर्स, कॅट आईज, ब्लिंकर्स, गतीरोधक, वाहतुक नियम साईन बोर्ड, रस्त्यांचे रूंदीकरण, डिव्हाईडर इत्यादी विविध प्रकारच्या अल्प मुदतीचे तसेच मध्य व दीर्घ मुदतीच्या उपाय योजना करणेबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता, संबंधित विभागांकडुन त्याप्रमाणे वेळोवेळी अल्प आणि  दीर्घ  उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. पोलीसांच्या अथक प्रयत्नाने तसेच रस्ते देखभाल करणाऱ्या विभागांच्या सहकार्याने सध्या राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीतील ७४२ ब्लॅकस्पॉट (Road Accident) अद्यावत असून २६२ ब्लॅकस्पॉट कमी झाले असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी पत्रकात दिली आहे.

कुठे किती ब्लॅकस्पॉट आहे? 

  • राष्ट्रीय महामार्ग – ५११
  • राज्य महामार्ग – १४७
  • इत्यादी रस्ते – ८४

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.