MD drugs seized : पुण्याचा होतोय पंजाब; तब्बल 1100 कोटी रुपयांचे 600 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त

158
MD drugs seized : पुण्याचा होतोय पंजाब; तब्बल 1100 कोटी रुपयांचे 600 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त
MD drugs seized : पुण्याचा होतोय पंजाब; तब्बल 1100 कोटी रुपयांचे 600 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी तब्बल 600 किलोहून अधिक मेफेड्रोन ड्रग्ज जप्त(MD drugs seized) केले आहे. विश्रांतवाडी येथील भैरवनगर येथील एका गोदामातून 55 किलो, तर कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून सुमारे 550 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत 1100 कोटींचे ड्रग जप्त(MD drugs seized) करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.(MD drugs seized)

या प्रकरणी वैभव उर्फ ​​पिंट्या भरत माने, अजय अमरनाथ करोसिया (वय 35) आणि हैदर नूर शेख (वय 40, विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.(MD drugs seized)

(हेही वाचा- Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जरांगेंची दादागिरी थांबवणार कि नाही; छगन भुजबळांचा विधानसभेत प्रश्न )

मिठाच्या गोण्यांमध्ये लपवले मेफेड्रोन

विश्रांतवाडीतील एक गोदाम हैदरने भाड्याने घेतलेले होते. या गोदामात मीठ व रांगोळीचा साठा करण्यात आला होता. पांढऱ्या स्फटिकांसारखे दिसणारे मेफेड्रोन ड्रग लहान पिशव्यांत भरण्यात आले होते. या पिशव्या मिठाच्या मोठ्या गोण्यांमध्ये लपवण्यात आल्या होत्या.(MD drugs seized)

मुंबईतील ड्रग्ज विक्रेत्यांची मिळाली माहिती

पोलिसांना या प्रकरणी पॉल व ब्रू नामक 2 ड्रग पेडलर्स म्हणजेच मुंबईतील ड्रग्ज विक्रेत्यांची माहितीही मिळाली आहे. जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग दलालांमार्फत देश-विदेशात वितरित केले जाणार होते.(MD drugs seized)

यापूर्वीही गेल्या २ महिन्यांत पुण्यात अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.