Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार; व्यक्त केला विश्वास

417
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार; व्यक्त केला विश्वास
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार; व्यक्त केला विश्वास

उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांचे आभार मानले आहेत. मी याक्षणी(maratha reservation) राजकारणावर फार बोलणार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिल्याचे सांगितले आहे. त्याविषयी मी त्यांना धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण(maratha reservation) विधेयक २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभेत संमत करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दरी वाढली होती. एकमेकांवर बरेच आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मानलेल्या आभाराची चर्चा होत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे लवकरच शिंदेंच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी नुकताच केला होता.(maratha reservation)

(हेही वाचा- MD drugs seized : पुण्याचा होतोय पंजाब; तब्बल 1100 कोटी रुपयांचे 600 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त )

उद्धव ठाकरे यांनी या वेळी मराठा समाजाला(maratha reservation) टिकणारे आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ठाकरे म्हणाले, ”आता एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेता हे आरक्षण कायद्याच्या सर्व कसोट्यांवर टिकेल. त्यातून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल, अशी आशा बाळगतो.”(maratha reservation)

किती तरुणांना नोकऱ्या मिळणार ?

ज्या पद्धतीने अभ्यास करून मराठा आरक्षणाचा(maratha reservation) मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर करण्यात आले, त्यावरून हा कायदा सर्वच निकषांवर टिकेल, असा मला विश्वास आहे. सभागृहात याविषयी समजून सांगण्याची गरज नव्हती. कारण सभागृहात एकमताने मराठा आरक्षणाला(maratha reservation) पाठिंबा दिला आहे. सरकारने शिक्षण व नोकऱ्यांत हे आरक्षण दिले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर हे अधिक स्पष्ट होईल. आता तातडीने मराठा समाजातील किती तरुणांना किती नोकरी मिळेल हे सरकारने सांगितले तर सोन्याहून पिवळे होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.(maratha reservation)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.