Manoj Jarange Patil मिळालेला जनाधार गमावण्याची शक्यता

305
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कडक कारवाई
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कडक कारवाई

राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के लोकसेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हटवादी भूमिका घेतल्याने जरांगे पाटील मिळालेला जनाधार (public support) गमावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(Manoj Jarange Patil)

(हेही वाचा- Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार; व्यक्त केला विश्वास )

ऐतिहासिक निर्णय

राज्यातील सामाजिक (Social) व शैक्षणिकदृष्ट्या (educational) मागासवर्गांकरिता आरक्षण (reservation) देणारे विधेयक मंगळवारी 20 फेब्रुवारीला विधानसभेत (assembly) एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी (Maratha community) 10 टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.(Manoj Jarange Patil)

तीन महिन्यात निर्णय

इतरमागासवर्ग (ओबीसी) (OBC) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर शासनाने तीन महिन्यात आरक्षणाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.(Manoj Jarange Patil)

(हेही वाचा- MD drugs seized : पुण्याचा होतोय पंजाब; तब्बल 1100 कोटी रुपयांचे 600 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त )

राज्याला कायदा करण्याचा अधिकार

हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे अशी ग्वाही देताना शिंदे यांनी भारताच्या संविधानाचा एक दाखला दिला. “भारताच्या संविधानाच्या (Indian Constitution) अनुच्छेद ३४२क चे खंड (३) हे, राज्याच्या प्रयोजनांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची यादी तयार करण्यासाठी आणि ती ठेवण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार, राज्याला प्रदान करते. राज्याला, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १५ (४), १५ (५) व १६ (४) या अन्वये शैक्षणिक संस्थांमध्ये व लोकसेवांमध्ये अशा वर्गास आरक्षण देण्याकरिता कायद्याद्वारे तरतूद करता येईल,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.(Manoj Jarange Patil)

विधेयकावर अविश्वास

या निर्णयाचे मराठा क्रांति मोर्चाच्यावतीने (Maratha Kranti Morcha) स्वागत करण्यात आले मात्र जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी या विधेयकावर अविश्वास व्यक्त करत ‘सगे-सोयरे’चाच मुद्दा रेटत जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. यापुढील त्यांच्या आंदोलनाला कितपत पाठींबा मिळेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.