Crime : पालघरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, ३८ कोटींचे एमडी जप्त

20
Crime : पालघरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, ३८ कोटींचे एमडी जप्त
Crime : पालघरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, ३८ कोटींचे एमडी जप्त

मिरा-भाईंदर मध्ये अमली पदार्थांची विक्री (Crime) करण्यासाठी आलेल्या अटक आरोपीच्या संपूर्ण साखळीचा तपास करून पालघर जिल्ह्याच्या मोखाड्यात अमली पदार्थांच्या सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. एका फार्म हाऊसमध्ये हा कारखाना थाटण्यात आला होता. मिरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून तब्बल ३८ कोटींचा एमडी येथून जप्त केला आहे. हा कारखाना मागच्या दीड वर्षांपासून सुरू होता.

मिरा-भाईंदरमध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण आले असून ते भाईंदर पूर्वेला असणाऱ्या एका हॉटेल मध्ये आठवडाभरापासून वास्तव्यास असल्याची माहिती १८ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, कारवाई केली असता ,तेथे २५१ ग्राम एमडी व जिवंत काडतुसे मिळून आल्याने सनी सलेकर, विशाल गोडसे, दीपक दुबे व शहबाज सेवा या चार जणांना अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा – Pravin Darekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारच आरक्षण देतील; प्रविण दरेकरांचा दावा)

आरोपीची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना दहिसरमधील नसीर अहमद चौधरी व भाईंदरच्या गौतम घोष ह्याचा देखील सहभाग असल्याची माहिती मिळाल्यान या दोघांना अटक करण्यात आली. वसईतील समीर पिंजारच्या पालघर मधील मोखाडा येथील एका फार्म हाऊसवर पोलिसांकडून नुकताच छापा टाकण्यात आला. येथील प्रयोग शाळेत विविध केमिकलच्या मदतीने अमली ( मेफेड्रोन ) पदार्थ तयार केले जात असल्याचे दिसून आले. येथून तब्बल १८ किलो एमडी जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ३६ कोटी रुपये इतकी आहे. हा कारखाना चालवणारा आरोपी समीर (४५) अटक करण्यात आली आहे. तो यापूर्वी हैदराबाद येथे एका रसायनाच्या कारखान्यात काम करत असे, त्याने अमली पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून ललित पाटील प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अविराज कुराडे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.