Cyber Crime : देशात सर्वात जास्त सायबर गुन्हे महाराष्ट्र, तेलंगणामध्ये ; गृह मंत्रालयाची माहिती

एनसीआरबीने नुकतीच २०२२ सालातील देशभरातील गुन्हेगरीची आकडेवारी जाहीर केली आहे

178
Deep Fake Video : बॉलिवूड पाठोपाठ शेअर्स बाजाराला डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका

एनसीआरबीने नुकतीच २०२२ सालातील देशभरातील गुन्हेगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातील सायबर गुन्हेगारीची आकडेवारी लक्षणीय असून, महाराष्ट्राची आणि मुंबईची चिंता वाढवणारी आहे. एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार, देशात सायबर गुन्हेगारीमध्ये तेलंगणा पहिला क्रमांक लागतो, तर महाराष्ट्र यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांचा नंबर लागतो. देशभरात गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हे ही मोठी समस्या बनत चालली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बनावट प्रोफाइल, सायबर स्टॅकिंग आणि ब्लॅकमेलिंग यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. (Cyber Crime)

गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राईम रेपार्टींग पोर्टल आणि डेटा पोर्टल आणि एनसीआरबीच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या सायबर गुन्हांचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारचे सायबर गुन्हे जास्त आहेत ते दिसून येतात. परिणामी राज्यावर सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार समजून घेऊन अशा गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन धोरण तयार करता येईल.  (Cyber Crime)

(हेही वाचा : Israel-Hamas conflict: इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा उपनेता ठार)

एटीएम फ्रॉड: देशभरात सर्वात जास्त ६३८ केस बिहारमध्ये

२०२२ मध्ये देशभरात एटीएमच्या माध्यमातून फसविण्याचा १६९० गुन्हे नोंदविले आहेत. या बाबतीत बिहार सर्वात पुढे आहे. बिहारमध्ये ६३८ एटीएम फ्रॉड नोंदले आहेत. यांनंतर तेलंगणा (६२४) आणि महाराष्ट्रात (१४४) येतो.

फेक प्रोफाइलचे सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रात
सोशल मीडियावर फेक प्रोफाइल बनवून फसवणूक केल्याचे सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि राजस्थानात समोर आली.या गुन्ह्यांचे एकूण १५७ प्रकरणे नोंदली होती. त्यात एकट्या महाराष्ट्रात ४८ तर राजस्थानात ३३ प्रकरणे समोर आली.

मुंबई दुसऱ्या स्थानावर

आकडेवारीनुसार मुंबईत सायबर गुन्हेगारी ६०  टक्क्यांनी वाढली आहे. देशात सायबर गुन्ह्यांच्या यादीत ४७२४ गुन्हांसह मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु चिंताजनक बाबा म्हणजे एकूण सायबर गुन्ह्यांमध्ये २०२२ साली दुपटीने वाढ झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाली आहे. २०२१ मध्ये मुंबईत नोंदवलेल्या २८८३ साय बर गुन्ह्यांची नोंद झाली होती. तसेच कोविड काळात २०२० मध्ये २४३३ प्रकरणे नोंदवली गेली. सायबर गुन्ह्यामध्ये बेंगळुरू २०२२ वर्षी ९९४० प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.