Israel-Hamas conflict: इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा उपनेता ठार

लेबनानमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

160
Israel-Hamas conflict: इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा उपनेता ठार
Israel-Hamas conflict: इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा उपनेता ठार

पॅलेस्टिनींविरुद्ध इस्रायलचे युद्ध मंगळवारी लेबनॉनची राजधानी बेरूतपर्यंत पोहोचले आहे. येथे इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा उपनेता (Israel-Hamas conflict) ठार झाला, अशी माहिती लेबनॉनमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एका उच्चस्तरीय सुरक्षा अधिकाऱ्याने याविषयी एएफपीला दिलेली माहिती अशी की, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या अभूतपूर्व हल्ल्यानंतर हमासचा नाश करण्याची शपथ घेतलेल्या इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात सालेह अल-अरुरी त्याच्या अंगरक्षकांसह ठार झाला.

(हेही वाचा – Truck Driver Strike: मालवाहतूकदारांचा संप मागे, इंधन पुरवठा सुरळीत होण्यास विलंब )

दुसर्‍या सुरक्षा अधिकाऱ्यानं माहितीची पुष्टी केली आहे. लक्ष्य करण्यात आलेल्या इमारतीचे २ मजले आणि १ कारचे नुकसान झाले आहे. लेबनॉनच्या इराण-समर्थित हिजबुल्लाह चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील हमासच्या कार्यालयावर हा हल्ला झाल्याची माहिती सरकारी माध्यमांकडून सांगण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.