Mahadev Betting App : ईडीची मुंबईसह देशभरात १५ ठिकाणी छापेमारी

अॅपचा मालक असल्याचा दावा करणाऱ्या शुभम सोनीने यापूर्वी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले होते आणि ईडीला प्रतिज्ञापत्र पाठवले होते आणि दावा केला होता की त्याच्याकडे राजकारणी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना लाच दिल्याचे "पुरावे" आहेत.

133
Mahadev Betting App : ईडीची मुंबईसह देशभरात १५ ठिकाणी छापेमारी

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी (Mahadev Betting App) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवार २८ फेब्रुवारी रोजी देशभरात १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, मुंबई आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्रात एकाच वेळी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Supreme Court : ईडीच्या समन्सचा सन्मान राखावाच लागेल)

सुमारे १८०० पानांचे नवीन आरोपपत्र दाखल :

महादेव अॅपद्वारे (Mahadev Betting App) बेकायदेशीर सट्टेबाजी आणि गेमिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने छत्तीसगडच्या रायपूर येथील विशेष न्यायालयात नवीन आरोपपत्र दाखल केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, फेडरल एजन्सी ही दुसरी फिर्यादी तक्रार (चार्जशीट) दुबईतील अधिकाऱ्यांसोबत शेअर करेल जेणेकरून अॅपचे २ मुख्य प्रवर्तक, रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर यांचे प्रत्यार्पण होईल. इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे ईडीच्या आदेशानुसार या दोघांनाही नुकतेच दुबईतून ताब्यात घेण्यात आले. (Mahadev Betting App) एजन्सीने प्रथम आरोपपत्रातील सामग्री युएई अधिकाऱ्यांकडे सामायिक केली ज्याच्या आधारावर या दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट प्राप्त झाले. त्यानंतर इंटरपोलने रेड नोटीस जारी केली. अधिका-यांनी सांगितले की, १ जानेवारी रोजी सुमारे १८०० पानांचे नवीन आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि कॅश कुरिअर असीम दास, पोलिस कॉन्स्टेबल भीम सिंह यादव, शुभम सोनी, ॲपशी संबंधित एक प्रमुख अधिकारी यांच्यासह पाच आरोपींना आरोपी म्हणून नाव देण्यात आले.

(हेही वाचा – Pune Municipal Corporation : नीलेश राणेंची मालमत्ता पुणे महापालिकेकडून सील; काय आहे कारण ?)

राजकारणी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना लाच दिल्याचे “पुरावे” आहेत – शुभम सोनी

अॅपचा मालक (Mahadev Betting App) असल्याचा दावा करणाऱ्या शुभम सोनीने यापूर्वी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले होते आणि ईडीला प्रतिज्ञापत्र पाठवले होते आणि दावा केला होता की त्याच्याकडे राजकारणी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना लाच दिल्याचे “पुरावे” आहेत. जेणेकरून ॲप कोणत्याही कायदेशीर कारवाईशिवाय अवैध धंदे चालवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. एजन्सीने रायपूर येथील विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात चंद्रकर आणि उप्पल यांच्यासह काही जणांची नावे घेतली होती.

(हेही वाचा – Railroad Project: नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता, वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग)

गुन्ह्याची अंदाजे रक्कम सुमारे ६ हजार कोटी :

ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील (Mahadev Betting App) गुन्ह्याची अंदाजे रक्कम सुमारे ६ हजार कोटी रुपये आहे. एजन्सीने नोव्हेंबरमध्ये दावा केला होता की, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आधी, फॉरेन्सिक विश्लेषण आणि असीम दास यांनी दिलेले विधान धक्कादायक आरोप केले होते. त्यानुसार महादेव बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांना आतापर्यंत सुमारे ५०८ कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान बघेल यांनी आरोप नाकारत याला प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हंटले आहे. (Mahadev Betting App)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.