Lalit Patil : ललित पाटील ३०० कोटी ड्रग्ज प्रकरण; मुंबईतील ड्रग्ज सप्लायरची धरपकड सुरू

ललित पाटील याने पोलीस चौकशीत मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पार्ट्यांमध्ये 'एमडी' हा अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्यांची नावे उघड करताच साकीनाका पोलिसांनी मुंबईतील एमडी पुरवठा करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.

23
Lalit Patil : ललित पाटील ३०० कोटी ड्रग्ज प्रकरण; मुंबईतील ड्रग्ज सप्लायरची धरपकड सुरू
Lalit Patil : ललित पाटील ३०० कोटी ड्रग्ज प्रकरण; मुंबईतील ड्रग्ज सप्लायरची धरपकड सुरू

ललित पाटील याने पोलीस चौकशीत मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पार्ट्यांमध्ये ‘एमडी’ हा अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्यांची नावे उघड करताच साकीनाका पोलिसांनी मुंबईतील ‘एमडी’ पुरवठा करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. (Lalit Patil)

साकीनाका पोलिसांनी गुरुवारी कुर्ला येथून अतिक शेख या एमडी विक्रेत्याला अटक केली आहे. अतिक शेख हा थेट ललित पाटील कडून ‘एमडी’ आणून मुंबईतील लहान मोठ्या विक्रेत्यांना विकत होता अशी महिती समोर येत आहे. साकीनाका पोलिसांनी प्रकरणात सुरू केलेल्या कारवाईत अतिक शेखची पहिली अटक केली असून त्याला देखील ३०० कोटींच्या एमडीच्या गुन्ह्यात अटक दाखवली आहे. या प्रकरणातील अतिक शेख हा १७ वा आरोपी आहे. (Lalit Patil)

(हेही वाचा – Rohit Sharma on Team India : ‘प्रत्येक खेळाडू वेगळा असतो, त्याचे गुण आणि त्याच्या गरजाही निराळ्या असतात – रोहित शर्मा’)

३०० कोटी ड्रग्ज एमडी प्रकरणात साकीनाका पोलिसांनी अटक केलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील हा पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीत त्याने मुंबईतील ड्रग्ज विक्रेत्यांची नावे पोलिस चौकशीत उघड केली आहेत. मुंबईतील ड्रग्ज विक्रेत्यांनी ललित याच्या नाशिक येथील फॅक्ट्रीमधून एमडी विकत घेऊन मुंबईत ते छोट्या विक्रेत्यांना विकत होते. हे ड्रग्ज विक्रेते कॉलेज विद्यार्थी आणि बड्या पार्ट्यांममध्ये ड्रग्ज पुरवठा करीत असल्याचे पाटील याने उघड केल्यानंतर साकीनाका पोलिसांनी या ड्रग्ज विक्रेत्यांची धरपकड सुरू केली असून अतिक शेख हा त्यातील एक ड्रग्ज पुरवठादार आहे. (Lalit Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.