Rohit Sharma on Team India : ‘प्रत्येक खेळाडू वेगळा असतो, त्याचे गुण आणि त्याच्या गरजाही निराळ्या असतात – रोहित शर्मा’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहीत शर्माने आपल्या संघ व्यवस्थापनाचा कानमंत्र अलीकडे स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उघड केला आहे.

170
Ind vs Eng 4th Test : रोहित शर्माच्या ४,००० कसोटी धावा पूर्ण 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघ व्यवस्थापनाचा कानमंत्र अलीकडे स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उघड केला आहे. त्याच्या मते प्रत्येक खेळाडू वेगळा आहे आणि त्याला ओळखून त्यांच्याकडून कामगिरी करून घ्यायची असते. (Rohit Sharma on Team India)

या विश्वचषकात एकटा भारतीय संघ आतापर्यंत अपराजित आहे. रोहित शर्माच्या कप्तानीखाली संघाने आतापर्यंत पाच पैकी पाचही सामन्यात निर्णायक विजय मिळवला आहे आणि फलंदाज तसंच गोलंदाजांनी गरजेप्रमाणे विजयात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणं कसं जमवतोय, असा प्रश्न स्पर्धेचं थेट प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीने एका मुलाखतीत रोहित शर्माला विचारला आणि त्याचं उत्तर देताना रोहितने आपल्या संघ व्यवस्थापन पद्धतीची यशाची गुरुकिल्लीच लोकांसमोर उघड केली. (Rohit Sharma on Team India)

‘सांघिक खेळ म्हणजे एकट्या दुकट्याचं काम नाही. तर एका संघात अकरा खेळाडू असतात. अशावेळी त्यातल्या प्रत्येक खेळाडूला कर्णधाराने समजून घेतलं पाहिजे. या खेळाडूच्या गरजा, त्याची क्षमता आणि त्याच्या आवडी निवडी समजल्या की त्यांचं नेतृत्व करणं शक्य होतं,’ असं सुरुवातीलाच रोहित शर्मा म्हणाला. (Rohit Sharma on Team India)

खेळाडूला समजून घेणं ही पहिली पायरी आहे आणि संघाचं व्यवस्थापन म्हणजे संघातील प्रत्येकाचं व्यवस्थापन असं रोहितला वाटतं. खेळाडूंबरोबर काही वर्षं राहून आपण आपली रणनीती बनवली असल्याचं रोहितला वाटतं. (Rohit Sharma on Team India)

‘मी आधी समोरच्या खेळाडूच्या भूमिकेत शिरून त्याला काय वाटत असेल याचा विचार करतो. असं करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. शिवाय मला सपोर्ट स्टाफचीही चांगलीच मदत मिळते. ते मदतीला कधीही हजर असतात. आम्ही सगळे मिळून एकमेकांच्या गरजा समजून घेऊन काम करतो,’ असं रोहित पुढे म्हणाला. (Rohit Sharma on Team India)

(हेही वाचा – Azad Maidan : शिवसेनेला हवाय आझाद मैदानातही शिवरायांचा पुतळा)

रोहीत शर्माला कर्णधार म्हणून ड्रेसिंग रुममध्ये मान आहे. आधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि पुढे भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही रोहितने चांगली कामगिरी केली आहे. खेळाडूंबरोबर सातत्यपूर्ण संवाद ठेवणारा कर्णधार असा त्याचा लौकीक आहे आणि खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणारा कर्णधार अशी त्याची ओळख आहे. (Rohit Sharma on Team India)

या विश्वचषक स्पर्धेपूर्वी रोहितच्या कप्तानीखाली भारतीय संघाने ३९ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यातल्या २९ सामन्यात भारताचा विजय झालाय. तर ९ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे रोहीतच्या विजयाची टक्केवारी ७४.३५ टक्के इतकी आहे. तर टी२० प्रकारात रोहितच्या कप्तानीखाली भारतीय संघाने ५१ पैकी ३९ सामने जिंकले आहेत. (Rohit Sharma on Team India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.