Narendra Modi: गोव्यात ३७व्या राष्ट्रीय खेळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

113
Narendra Modi: गोव्यात ३७व्या राष्ट्रीय खेळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
Narendra Modi: गोव्यात ३७व्या राष्ट्रीय खेळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी, गोव्यातील पणजी येथे ३७ व्या राष्ट्रीय खेळांचे (37th National Games) उद्घाटन केले. दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर या खेळांचे सामने होणार आहेत. गोव्यात प्रथमच राष्ट्रीय खेळ होत असून हे खेळ 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. देशभरातील 10,000 हून अधिक खेळाडू 28 ठिकाणी 43 क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतील.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पंतप्रधानांचा राज्याची संस्कृती आणि अस्मितेचे प्रतीक असलेली कुणबी शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या जमावाला अभिवादन करून पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, आपल्या देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या विविध योजनांची आठवण उपस्थितींना करून दिली. केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत खेळांसाठी एक इकोसिस्टिम तयार केली असल्याचेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Rohit Sharma on Team India : ‘प्रत्येक खेळाडू वेगळा असतो, त्याचे गुण आणि त्याच्या गरजाही निराळ्या असतात – रोहित शर्मा’ )

आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले की, पूर्वीचे सरकार अत्यंत नम्र होते. लोकांना खेळावर खर्च करण्याची गरज आहे, असे वाटत नव्हते, मात्र आमच्या सरकारने हा विाचर बदलला. आम्ही खेळावरील खर्चाचे बजेट वाढवले. ९ वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून ती नेहमीच्या तुलनेत तिप्पट आहे.

भारतातील गल्ल्या आणि गावांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे कार्य लहान लहान शहरांमधूनही होत असते. छोट्या शहरांमध्येही चॅम्पियन्स जन्माला येतात. प्रत्येक वेळी आम्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आमची पदकतालिका पाहायचो, तेव्हा प्रत्येक नागरिकाला आश्चर्य वाटेल. म्हणूनच २०१४ नंतर राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे आम्ही क्रीडा जगतातील पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणला आणि प्रक्रिया बदलल्या. आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून खेळाडूंच्या आर्थिक मदतीत बदल घडवून आणला, मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे विचारात बदल घडवून आणला. जुना दृष्टिकोन, रस्त्यातील अडथळे एकामागून एक दूर केले गेले आहेत. केंद्र सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करून खेळाडूंसाठी विविध ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करत आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाद्वारे दिली.

खेलो इंडिया ते टॉप्स (लक्ष्य, ऑलिम्पिक, पोडियम योजना) अशी एक नवीन इकोसिस्टम तयार केली. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या पातळीवर क्षमता असलेले खेळाडू ओळखले जात आहेत आणि सरकार प्रशिक्षण आणि आहारावर भरपूर पैसा खर्च करत आहे. आज 3,000 तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे,” असे मोदी म्हणाले, खेळाडूंना विविध खेळांमध्ये यश मिळावे यासाठी शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, ते भविष्यात नवीन खेळाडूंसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.