Lalit Patil Drug Case : ललित पाटील नदीच्या पाण्यात ड्रग्ज लपवायचा; जाणून घ्या नेमका प्रकार काय?

117
Lalit Patil Drug Case : ललित पाटील नदीच्या पाण्यात ड्रग्ज लपवायचा; जाणून घ्या नेमका प्रकार काय?

पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूतील चेन्नई येथे अटक केली. तो २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळून गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

ललिल पाटील (Lalit Patil Drug Case) रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि येरवडा कारागृह प्रशासन याबाबत अनेक आरोप- प्रत्यारोप होत होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही यामध्ये समावेश झाला. यादरम्यान मुंबई साकीनाका पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली, आणि रोज याप्रकरणी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता अजून एका गोष्टीमुळे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाला नवीन वळण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून (Lalit Patil Drug Case) मोठे ऑपरेशन मुंबई पोलिसांनी राबवले. ललित पाटील याच्या साथीदारांनी नदीपात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढण्यासाठी हे ऑपेरशन राबवण्यात आले. त्यात पोलिसांनी मोठे यश आले आहे.

(हेही वाचा – Crime : पालघरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, ३८ कोटींचे एमडी जप्त)

मुंबई पोलिसांनी सोमवारी ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याची पोलीस कोठडी वाढवून मागितली. त्यानुसार न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. त्यानंतर ललित पाटील याचा चालक सचिन वाघ याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ललितने ड्रग्जचा मोठा साठा नदीपात्रात फेकल्याचे समजले. हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने ऑपरेशन राबवले. त्यानंतर कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज मिळाले आहे.

अधिक माहितीनुसार, नाशिक सटाणा रस्त्यावरील लोहनेर ठेंगोडा गावातील गिरणा नदीपात्रातून कोट्यावधी (Lalit Patil Drug Case) रुपयांचा ड्रग्जचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ३ ते ४ तास अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने १५ फूट खोल नदीपात्रात रात्रीच्या अंधारात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.