Bangladesh Train Accident : दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्या; २० जणांचा मृत्यू

प्रवासी आणि माल गाडीची झाली टक्कर

91
Bangladesh Train Accident : दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्या; २० जणांचा मृत्यू

बांगलादेशात काल म्हणजेच सोमवार २३ ऑक्टोबर रोजी दोन रेल्वे (Bangladesh Train Accident) एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. ढाका शहरानजीकच्या कृष्णगंज जिल्ह्यात मालगाडी आणि प्रवासी रेल्वेची टक्कर होऊन हा अपघात घडला. दरम्यान या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Bangladesh Train Accident)

या अपघाताबाबत बांगलादेशच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी (Bangladesh Train Accident) सांगितले की, प्रवासी रेल्वे कृष्णगंज ते ढाका जात असताना हा अपघात झाला. आतापर्यंत घटनास्थळाहून २० मृतदेह आढळून आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Lalit Patil Drug Case : ललित पाटील नदीच्या पाण्यात ड्रग्ज लपवायचा; जाणून घ्या नेमका प्रकार काय?)

अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृत्यूचा आकडा वाढू शकतो असे (Bangladesh Train Accident) रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अजूनही अनेकजण अपघातग्रस्त रेल्वे कोचच्या खाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु झाले आहे. दरम्यान अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.(Bangladesh Train Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.