Lalit Patil : ड्रग्ज प्रकरणी तपासाला वेग; ललित पाटीलला घेऊन पोलिसांची नाशिकमध्ये झडती

नाशिक ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या ललित पाटीलला घेऊन मुंबई पोलिसांच्या त्यांच्या नाशिकमधील घराची मुंबई पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे.

71
Lalit Patil : ड्रग्ज प्रकरणी तपासाला वेग; ललित पाटीलला घेऊन पोलिसांची नाशिकमध्ये झाडाझडती
Lalit Patil : ड्रग्ज प्रकरणी तपासाला वेग; ललित पाटीलला घेऊन पोलिसांची नाशिकमध्ये झाडाझडती

मुंबई पोलिसांनी २१ ऑक्टोबरला रात्री उशिरा ललित पाटील याला त्याच्या नाशिक येथील घरी घर झडतीसाठी नेले. (Lalit Patil) 4.30 ते 5 वाजेच्या सुमारास या ठिकाणी घराची झाडाझडती घेऊन पोलिसांनी काही साहित्य ताब्यात घेतल्याचे समजते आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्या शिंदे गावात हे सगळे घडत होत, त्या ड्रग्ज कारखान्यात ललित पाटीलला नेण्यात आले. पोलिसांचा दावा आहे की, तो दाखल असलेल्या रुग्णालयातून एमडी ड्रग्सची तस्करी आणि व्यवसाय करत होता. ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटीलच्या संपर्कात होता आणि ड्रग्जचा व्यवसाय करत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. (Lalit Patil)

(हेही वाचा – Madhya Pradesh Assembly Elections : भाजपची पाचवी यादी जाहीर)

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या भूषण पाटील यास तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. त्यानंतर ललित पाटीलला देखील अटक करण्यात आली. आता त्याला देखील मुंबई पोलिसांनी काल रात्री उशिरा नाशिकमध्ये आणून ललित पाटीलच्या संबंधित ठिकाणांची झाडाझडती घेतल्याचे समोर आले आहे. (Lalit Patil)

नाशिक ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या ललित पाटीलला घेऊन मुंबई पोलिसांच्या त्यांच्या नाशिकमधील घराची मुंबई पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. नाशिकमधील उध्वस्त केलेल्या ट्रस्ट फॅक्टरीत ललित पाटीलसोबत झाडाझडती केल्यानंतर मुंबई पोलीस ललित पाटीलला घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.

ललित पाटील पैसे देऊन रूग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करायचा. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी ललितने डॉक्टर आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले. ससून रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. ललितवर नजर ठेवण्यासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनाही तो पैसे द्यायचा, अशी माहिती आहे. (Lalit Patil)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.