Bar : डोंबिवलीत शूट आऊट ॲट लोखंडवालाची रिमिक्स

154
Bar : डोंबिवलीत शूट आऊट ॲट लोखंडवालाची रिमिक्स
Bar : डोंबिवलीत शूट आऊट ॲट लोखंडवालाची रिमिक्स
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण-शिळ महामार्गावर डोंबिवली (Dombivli) जवळच्या गोळवलीतील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेव्हन स्टार (Seven Star) या नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लेडीज बारवर (Bar) मानपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री अचानक धाड टाकून अश्लील नृत्य आणि पैशांची उधळण करणाऱ्या बार (Bar) मालकासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सेव्हन स्टार लेडिज बारमध्ये तंग कपडे परिधान करून तेथील बारबाला शूट आऊट ॲट लोखंडवाला या हिंदी चित्रपटातील उनके नशेमें चलते रहे…या गाण्याच्या तालावर अश्लिल नृत्य करून ग्राहकांना भुरळ घालत असताना आढळून आल्या. कारवाई दरम्यान हा बार जागच्या जागी बंद करण्यात आला. या बारवर पूर्वी अनेकदा धाडी पडल्या आहेत.

या बारमध्ये बसलेले ग्राहक तेथील बारबालांवर नोटांची उधळण करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संंदीपान शिंदे यांच्याकडे आल्या होत्या. वाढत्या तक्रारींना अनुसरून पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अचानक कारवाई करून या बारचे मालक, व्यवस्थाक, महिला, पुरूष सेवक अशा एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षभरापासून कल्याण-शिळ आणि कल्याण-मलंगगड भागातील अनेक बारवर (Bar) पोलिसांनी रात्रीच्या वेळेत कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. बारचे चालक कारवाईनंतर काही दिवस शांत राहतात. त्यानंतर पुन्हा आपल्या बारमधील महिला वेटर्सच्या माध्यमातून ग्राहकांबरोबर अश्लिल नृत्य हावभाव सुरू ठेवतात.

(हेही वाचा – Russia मध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला; पोलिसांसह ४ जण गंभीर जखमी)

वपोनि संदीपान शिंदे यांना खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोळवली गावच्या हद्दीतील सेव्हन स्टार लेडिज बारमध्ये महिला सेविका तोकडे कपडे परिधान करून कानठळ्या बसविणाऱ्या वाद्यवृंदावरील हिंदी/मराठी गाण्यांच्या तालावर अश्लिल हावभाव, बिभत्स नृत्य करत ग्राहकांना आकर्षित करत आहेत. दारूच्या नशेत धुंद झालेले ग्राहक या बारबालांवर नोटांची उधळण करत आहेत. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर बारवर रात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकण्याची तयारी केली. ठरल्या वेळेत रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या बारवर छापा टाकला. त्यावेळी तेथील बारबाला उनके नशेमें चलते रहे…या गाण्यावर थिरकताना आढळून आल्या. पोलिसांना पाहून ग्राहक, बारबाला आणि वेटर्सची पळापळ झाली. पोलिसांनी बारचे दोन्ही कडील दरवाजे बंद करून सर्वांना रोखून धरले. विशेष म्हणजे आठ ग्राहक तर तोकड्या कपड्यांतील बारबालांवर नोटांची उधळण करत असल्याचे आढळून आले. सदर बारचे चालक, मालक, व्यवस्थापक, रोखपाल, ऑर्केस्ट्रा चालकांची पोलिसांनी चौकशी केली. बारबालांवर ग्राहकांनी उधळलेल्या नोटा जमिनीवर पडल्या होत्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमान्वये पोलिसांनी सदर बारच्या मालकाला नोटीस देऊन कारवाई आणि समज देण्याची प्रक्रिया केली.

या प्रकरणात पोलिसांनी बार मालक रघुराम शेट्टी (रा. अंबरनाथ), व्यवस्थापक प्रकाश गौडा, ऑर्केस्ट्रा चालक सुनील कोंडविलकर, कॅशियर अभिमन्यू नायक यांच्यासह पुरूष वेटर्स अनिल शेट्टी, अशोक साव, अजंता शेट्टी, बाळेश्वर साव, अंंकुश पाठक, विकास यादव, रमेश कोळी, प्रेम चव्हाण, मयूर भोईर, कौशल पाटील, रोहित भाग्यवंत, संदीप शिंदे, मारूती हाटकर, वेटर्स साक्षी कर्मावत, पुजा पुजारी, भूमी भेडिया, अंजू करमबली, दीपा शेट्टी, लक्ष्मी दयनवत, प्रेरणा कर्मावत आणि ज्योती शर्मा यांच्या विरूध्द गन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.