Mumbai Kalachowki Mahaganpati : गणेशोत्सवाच्या काळात लालबाग परिसरात भाविकांची मोठी गर्दी असताना काळाचौकी येथील महागणपती परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास विजेचा धक्का लागून गंभीर दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत पाच जणांना विजेचा धक्का बसला. त्यापैकी एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली आहे.
ही घटना रविवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास, काळाचौकी येथील महागणपती परिसरात घडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजेच्या धक्क्यामुळे जखमी झालेल्या पाच जणांना भायखळा येथील मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी एका मुलीला पुढील उपचारासाठी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले होते. (Mumbai Kalachowki Mahaganpati)
उपलब्ध माहितीनुसार, जखमींमध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश असून त्यांचे वय साधारण ८ ते २० वर्षांच्या दरम्यान आहे. मसीना रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहितीही देण्यात आली होती. (Mumbai Kalachowki Mahaganpati)
दरम्यान, मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आठ वर्षीय रघनी घनश्याम यादव, हिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, नेमका विजेचा धक्का कशामुळे लागला, विद्युत यंत्रणेत काही बिघाड होता का किंवा दुर्घटनेमागे अन्य कोणते कारण होते, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. सध्या स्थानिक पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Mumbai Kalachowki Mahaganpati)
हेही वाचा: गणपतीपुळे मंदिरात Dress Code सक्तीचा; केव्हापासून होणार अंमलबजावणी? वाचा…
घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने आणि परिसरात गणेशोत्सवासाठी भाविकांची गर्दी असताना दुर्घटना घडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Mumbai Kalachowki Mahaganpati)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

