Jumbo Covid Centre scam : ईडीकडून सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डीसुले यांना अटक

101
Jumbo Covid Centre scam : ईडीकडून सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डीसुले यांना अटक

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जम्बो कोविड सेंटर घोटाळा (Jumbo Covid Centre scam) प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरु होती. यावरून राज्यातील राजकारण देखील तापलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता ईडीकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत तर डॉ. किशोर डीसुले हे जम्बो कोविड सेंटर रुग्णालयाचे प्रभारी होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डीसुले यांना आज गुरुवार २० जुलै रोजी दुपारच्या सत्रात विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – NDA vs India : दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात पोलिस तक्रार)

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कॉन्ट्रॅक्ट पात्रता नसलेल्या लोकांना देण्यात आले होते. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता.

एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे आता एसआयटी देखील अॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.