ISIS Terrorists : दिल्लीत अटक करण्यात आलेले दहशतवादी बीटेक, इंजिनीअर; अनेक बॉम्बस्फोटांत सहभाग

113
ISIS Terrorists : दिल्लीत अटक करण्यात आलेले दहशतवादी बीटेक, इंजिनीअर; अनेक बॉम्बस्फोटांत सहभाग
ISIS Terrorists : दिल्लीत अटक करण्यात आलेले दहशतवादी बीटेक, इंजिनीअर; अनेक बॉम्बस्फोटांत सहभाग

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS च्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. (ISIS Terrorists) शाहनवाज उर्फ शफी उज्जामा, मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद अर्शद वारसी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांना ISIS च्या दिल्लीतील कारवायांची माहिती मिळाल्यानंतर ते अनेक दिवसांपासून आतंकवाद्यांवर लक्ष ठेवून होते. दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, स्पेशल सेल इंडियन मुजाहिदीन आणि आयएसआयएसच्या म्होरक्यांवर दीर्घकाळापासून नजर ठेवून आहे. अशा अनेक मॉड्यूल्सचा भंडाफोड करण्यात आला आहे. या मालिकेत स्पेशल सेलने गेल्या महिन्यात ३ जणांवर बक्षीस जाहीर केले होते, ज्यांच्यावर विविध बॉम्बस्फोटांशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोप आहे. मुख्य आरोपी शाहनवाजला त्याच्या अन्य दोन साथीदारांसह २ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. दुसरा आरोपी मोहम्मद रिझवान हा फरार आहे. तिन्ही दहशतवाद्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांच्या जागेवर छापा टाकला असता वेगवेगळी उपकरणे बनवण्यासाठी लागणारी स्फोटके जप्त करण्यात आली. पिस्तूल, काडतुसे, बॉम्ब बनवण्याबरोबरच अनेक साहित्यही सापडले. (ISIS Terrorists)

(हेही वाचा – ISIS Terrorists : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांना अटक; राममंदिर आणि मोठे नेते होते टारगेट)

उच्चशिक्षित आतंकवादी

ISIS मॉड्यूल प्रकरणातील या दहशतवाद्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समान आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही अभियंते आहेत आणि त्यापैकी एक पीएचडी करत आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (NIA) मोस्ट वाँटेड यादीत असलेला मोहम्मद शाहनवाज हा झारखंडमधील हजारीबागचा आहे. त्याने प्रतिष्ठित विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून खाण अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. अटक करण्यात आलेल्या त्याच्या २ साथीदारांपैकी मोहम्मद अर्शद वारसी हा देखील झारखंडचा आहे. याने अलीगड विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकचे शिक्षण घेतले होते. तो सध्या दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून डॉक्टरेट करत होता, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेला तिसरा आतंकवादी मोहम्मद रिजवान अश्रफ, त्याने संगणक शास्त्रात बीटेक पूर्ण केले आहे. त्याने मौलवी म्हणून प्रशिक्षणही घेतले होते. पोलिसांनी सांगितले की, अशरफ हा उत्तर प्रदेशातील आझमगडचा आहे. (ISIS Terrorists)

सीमेपार कनेक्शन

शानवाज यापूर्वी पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता आणि तो दिल्लीत राहत होता. त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीस होते. प्राथमिक प्लास्टिकच्या नळ्या, लोखंडी पाईप्स, विविध प्रकारची रसायने, स्फोटक उपकरणे बनवण्यासाठी वापरता येणारी टायमिंग साधने, पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बॉम्ब बनवण्याबाबतचे साहित्य त्यांच्या सीमेपलीकडील हस्तकाने पाठवले होते. (ISIS Terrorists)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.