Kalyan Crime : धक्कादायक घटना : आईसमोरच मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला

हल्लेखोराला कठोर शिक्षेची मागणी

135
कल्याणातील धक्कादायक घटना : आईसमोरच स्वतःच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला
कल्याणातील धक्कादायक घटना : आईसमोरच स्वतःच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला

कल्याणमधील (Kalyan Crime)  तिसगाव परिसरामध्ये एक धक्कादायक घटना बुधवारी ( १६ ऑगस्ट)  घडली आहे. येथे एका तरुणाने १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करुन तिची हत्या केली आहे. ही तरुणी आपल्या आईबरोबर घरी जात असतानाच तिच्यावर एका तरुणाने अचानक प्राणघातक हल्ला केला. यात या तरुणीचा मृत्यू झाल्याने कल्याण शहरात एकच खळबळ उडाली आहे. आदित्य कांबळे (२०) असे या  हल्लेखोरांचे नाव असून त्याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कल्याण पूर्वेतील तिसगाव येथील दुर्ग दर्शन या सोसायटीच्या आवारात  घडली.  हि मुलगी तिच्या आईबरोबर घरी जाताना सोसायटीच्या आवारामध्ये शिरली असता  तिच्यावर हल्ला झाला. हल्ले खोर समोरुन आला आणि या मुलीवर वार करण्यास त्याने सुरुवात केली. या मुलीवर तरुणाने ७ते ८ वेळा वार केले. यानंतर हा तरुण घटनास्थळावरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच नागरिकांनी त्याला पकडले. जखमी अवस्थेत या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

(हेही वाचा : Chess World Cup : गुकेश आणि विदिथचा पराभव; एकच भारतीय जाणार उपांत्य फेरीत)

घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, आई व तिची मुलगी  इमारतीच्या गेटमधून बोलत बोलत आत आल्यानंतर इमारतीच्या कम्पाऊण्ड जवळ लपून बसलेल्या या तरुणाने अचानक या मुलीवर हल्ला केला. या मुलीवर तरुणाने चाकूने वार केले. मुलीला वाचवण्यासाठी तिच्या आईने हल्लेखोराला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर या महिलेला बाजूला ढकलून मुलीवर चाकूने वार करत राहिला. दरम्यान यात त्या मुलीचा मृत्यू झाला. या मुलाला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी तिच्या घरच्यांकडून व स्थानिक रहिवाशांकडून  केली जात आहे. मात्र या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.