State Health Department : राज्याच्या आरोग्य विभागातील महत्वाची पदे रिकामी

आरोग्य विभागाच्या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा निघाला आहे

113
State Health Department : राज्याच्या आरोग्य विभागातील महत्वाची पदे रिकामी
State Health Department : राज्याच्या आरोग्य विभागातील महत्वाची पदे रिकामी

कळवा येथील सरकारी रुग्णालयात १८ जणांचा आकस्मिक मृत्यू झालेला राज्याच्या आरोग्य विभागातील महत्वाची पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात २ संचालक, ४ अतिरिक्त संचालक, ५ सहसंचालक, २३ उपसंचालक ही सगळी प्रमुख पदे रिकामी आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा निघाला आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील महत्वाची पदे रिक्त असताना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा कशी उपलब्ध होणार असा प्रश्न आरोग्यसेवा कार्यकर्त्यांनी विचारला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ३३८, तज्ज्ञ डॉक्टरांची ४७९, अ श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९८३, ब श्रेणीतील २३८ पदे रिकामी आहेत.

ठाण्यातील कळवा रुग्णालयातही मनुष्यबळाची कमतरता –

कळवा रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेनंतर आरोग्य विभागावर मोठया प्रमाणात टीका झाली. या प्रकरणी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत. नगरविकास विभागांतर्गत ठाण्याचे रुग्णालय येते. मग आरोग्य विभाग कशी चौकशी करते? असा प्रश्न आरोग्यसेवा चळवळीतील कार्यकर्त्यांनी विचारला. ठाण्यातील रुग्णालयात डॉक्टर्स आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची वानवा आहे. ही पदे तातडीने भरा ही मागणी जोर धरू लागली आहे.

(हेही वाचा – Monsoon Update : मान्सुनने फिरवली पाठ, उत्तर महाराष्ट्र पडला कोरडा!, ‘या’ जिल्ह्यांचे शेतकरी संकटात)

राज्यातील आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार –

सार्वजनिक आरोग्य विभागातील महत्वाची पदे महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या माध्यमातून भरली जावीत अशी तजवीज असताना प्रत्यक्षात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. पदोन्नती न मिळाल्यामुळे अगोदरच्या श्रेणीतील अधिकाऱ्यांना अतिरिक्त भार देत संचालक पदावर नियुक्त केले जात आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आरोग्य संचालक पदावरील अधिकाऱ्याचे न्यायालयीन प्रकरण बरेच गाजले होते.

आरोग्य विभागातील अन्य रिक्त पदे –
  • मंजूर पदे – ६५ हजार ७९१
  • भरलेली पदे – ४८ हजार ६८६
  • रिक्त पदे – १७ हजार १०५

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.