दर्शना पवार हत्याकांड : आधी कटरने वार आणि मग… ; आरोपी राहुलने केला हत्येचा खुलासा

दर्शनाने राहुलसोबतच्या विवाहास नकार दिल्यानं राजगडावर जाताना त्यांच्यात वादावादी झाली.

170
दर्शना पवार हत्याकांड : आधी कटरने वार आणि मग... ; आरोपी राहुलने केला हत्येचा खुलासा

काही दिवसांपूर्वी दर्शना पवार या तरुणीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. एमपीएससी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा एका संस्थेकडून सन्मान करण्यात आला. त्या सन्मानासाठी पुण्याला गेलेली दर्शना अचानक बेपत्ता झाली. नंतर तिच्या घरच्यांनी तिच्या गायब होण्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. त्यानंतर अचानक वेल्हा तालुक्यात असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोलिसांना तिचा मृतदेह सापडला.

अशातच आता एक थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी राहुल हंडोरेनं दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरनं वार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती स्वतः आरोपी राहुल याने त्याच्या कबुलीजबाबात दिली आहे.

(हेही वाचा – हार्बर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु)

रागाच्या भरात घडला गुन्हा

दर्शनाने राहुलसोबतच्या विवाहास नकार दिल्यानं राजगडावर जाताना त्यांच्यात वादावादी झाली. राग अनावर झाल्यानं राहुलनं आधी तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरनं तीन ते चार वार केले, त्यानंतर तिच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. नंतर त्यानं बाजूचा दगड उचलून तिच्या डोक्यावर जीवघेणा वार केला. दर्शनाची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता, रागाच्या भरात माझ्या हातून हा गुन्हा घडला, असा दावा राहुलनं पोलिसांसमोर केला आहे.

दर्शनाचं लग्न ठरलेलं कळताच राहुल हंडोरे अस्वस्थ झाला आणि त्याने दर्शनाच्या घरच्यांना सांगितलं की, थोडी वाट पहा मी देखील परीक्षेत यशस्वी होईल आणि मग मी दर्शनासोबत लग्न करेन. पण घरच्यांनी राहुलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान सत्कारासाठी पुण्यात आलेल्या दर्शनाला राहुलने ट्रेकिंगच्या बहाण्याने राजगडावर नेले आणि तिथेच त्याने तिची हत्या केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.