Crime : तरुणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित मुस्लिम धर्मगुरुला अटक

193
Manipur Police: भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७ जण मणिपूर पोलिसांच्या ताब्यात

ठाण्यात (Crime) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला मुस्लिम धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या सोहेबलाल शेख ऊर्फ युसूफबाबा याच्यासह त्याच्या टोळीतील ७ जणांना अटक करण्यात आली आहे. युसूफ बाबा आणि त्याच्या टोळीने ठाणे जिल्ह्यातील अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. “माझ्या शरीरात दैवी शक्ती आहे. त्या दैवी शक्तीने मी पैशांचा पाऊस पाडतो, (The godman lured the girl by promising a rain of cash)असे सांगून या धर्मगुरूने आणि त्याच्या टोळीने तरुणी आणि महिलांवर लैंगीक अत्याचार करून त्यांचे व्हिडीओ बनवून सेक्स रॅकेट चालवले होते. ठाणे गुन्हे शाखा १ ने या मुस्लिम धर्मगुरू आणि त्याच्या चेल्याच्या मुसक्या आवळून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.

साहेबलाल वजीर शेख ऊर्फ युसूफ बाबा (६१), अस्लम शमी उल्ला खान (५४) आणि सलीम जखरुद्दीन शेख (४५), तौसिफ शेख (३०), शबाना शेख (४५), शबीर शेख ( ५३), हितेंद्र शेट्ये (५६) असे अटक करण्यात आलेल्या धर्मगुरू आणि त्याच्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. स्वतःला धर्मगुरू म्हणून घेणारा युसूफ बाबा हा अँटॉप हिल हिल येथे राहात असून इतर आरोपी हे ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे आहेत. युसूफ बाबा हा स्वतःला मुस्लिम धर्मगुरू असल्याचे सांगतो तसेच त्याच्या शरीरात दैवी शक्ती संचारते तसेच त्याच्या शरीरात आत्म्यांचाही संचार होतो. त्यांना खूश केलं की, ते आत्मे पैशांचा पाऊस पाडतात, असे सांगून युसूफ बाबा महिला आणि तरुणीचे लैगिंग शोषण करीत होता. (The godman lured the girl by promising a rain of cash)

(हेही वाचा – Narendra Modi: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन)

इतर सह आरोपी गरजू आणि गरीब महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवून बाबाकडे घेऊन येते होत्या. बाबा त्यांना एक व्हिडीओ दाखवून त्या व्हिडीओमध्ये एक महिला नग्न अवस्थेत पडलेली असून तिच्या आजूबाजूला पैशांची रास पडलेली आहे. हा व्हिडियो तरुणी आणि महिलांना दाखवून त्यांनी युसूफ बाबामध्ये आलेल्या आत्म्याला खूश केले, तर जीनला खूश केले, तर ते पैशांचा पाऊस पाडतात, असे सांगून तरुणी आणि महिलांचा उपभोग घेऊन युसूफ बाबा आणि त्याची टोळी सेक्स रॅकेट चालवत होती. ठाणे राबोडी येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलीचा शोध घेत असताना ठाणे गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश करून स्वतःला धर्मगुरू सांगणारा युसूफ बाबा आणि त्याच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. ९०च्या दशकात हा मस्कतमध्ये होता. त्यानंतर तो भारतात परतला होता. सोहेबलाल शेख ऊर्फ युसूफ बाबा म्हणून ओळखला जाणारा मुस्लिम धर्मगुरू हा मुंबईत राहणारा असून ९०च्या दशकात भारतात आल्यानंतर त्यांची पैशांचा पाऊस पाडतो म्हणून एका तांत्रिकाने फसवणूक केली होती. त्याने आपली टोळी तयार करून या टोळीत महिलांनादेखील सामील करून घेतले होते. ठाणे गुन्हे शाखा १ने सापळा रचून या धर्मगुरुला अटक केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.