उत्तर प्रदेशच्या लखनौमधून नशेच्या औषधांची तस्करी (Crime News ) करत मालेगावात विक्रीचे रॅकेट चालवणारा भिवंडीचा संशयित मोहम्मद अयाज निसार अहमद अन्सारी (४८) याला पवारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि. ३) रात्री ओवाडी नाला परिसरात ४ लाख रुपये किमतीच्या ६० हजार कुत्ता गोळ्यांचा (अॅलप्राझोलम) साठा जप्त करण्यात आला आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. (Crime News )
हेही वाचा-Pahalgam Attack Update : पाकिस्तानचे चार तुकडे होणारच!
शहरात वाढती नशेखोरी गुन्हेगारीचे मूळ ठरत असल्याने पोलिसांनी आता नशेचा बाजार मांडणाऱ्यांना रडारवर घेतले आहे. मागील कारवायांच्या चौकशीत याचे धागेदोरे भिवंडीपर्यंत पोहोचले होते. अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी संशयित अयाजच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. अयाज हा शहरातील अकरा हजार कॉलनीत खोली घेऊन वास्तव्य करत होता. शनिवारी रात्री तो कुत्ता गोळ्या विक्रीच्या हेतूने ओवाडी नाला परिसरात फिरत होता. त्याच्याजवळील बॅगेत साठा असल्याची खात्री होताच पवारवाडीचे निरीक्षक सुधीर पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले. (Crime News )
गुजरातमधून नशेची औषधे आणली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी हे रॅकेट चालवणारा धुळ्याचा मुजम्मील हुसैन, शेरगिल जाविद यांना अटक केली होती. टोळीतील अब्दुल मुस्सवीर इर्शाद अहमद उर्फ कोमडदादा व सूरतचा जुबेर युसूफ शेख उर्फ आर. के. यांनाही अटक केली होती. आता लखनौ शहरातून नशेची औषधे आणली जात आहे. या रॅकेटमध्ये नवीन व्यक्ती सक्रीय असल्याचा पोलिसांना संशय आहे. (Crime News )
काय आहे कुत्ता गोळी ?
औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला, तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून, त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधिर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते, तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळेच या गोळीला ‘कुत्ता गोळी’ असे म्हंटले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो. निद्रावस्था टाळल्यास अशी व्यक्ती स्वत:वरचे नियंत्रण गमावते. या नियंत्रणहीन झालेल्या व्यक्तीच्या भावना भडकल्यास ती कोणतेही कृत्य करण्यास उद्युक्त होते. (Crime News )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community

