MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

58
MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

MCOCA: हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारूच्या अवैध विक्रीतून २१ जणांचा बळी घेणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. हडपसर परिसरातील चार तसेच दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ नागरिकांचा मिथॅनॉल मिश्रित विषारी दारूच्या सेवनाने मृत्यू झाला होता.

टोळीप्रमुख दत्ता उर्फ भाऊ भिवराव लोंढे याच्यासह त्याच्या आठ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर परिसरातील चार तसेच दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ नागरिकांचा मिथॅनॉल मिश्रित विषारी दारूच्या सेवनाने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा – विद्यार्थ्यांनी वर्षातून एकदा शेतात पाऊल टाकले तर काय बदलू शकतो? Rahul Narwekar यांनी मांडला नवा विचार

या गुन्ह्याचा तपास ‘सीआयडी’कडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान, आरोपी दत्ता लोंढे (रा.उरुळी कांचन) याने टोळी तयार करून विषारी दारूची निर्मिती, वाहतूक व विक्री सुरू ठेवल्याचे उघड झाले. या अवैध धंद्यातून टोळीने मोठा आर्थिक फायदा मिळवला होता. या टोळीच्या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपींमध्ये टोळीप्रमुख दत्ता लोंढे, आकाश दीपक जाधव (हडपसर), योगेश राजेंद्र व्हनकडे (मुंढव,) राधेशाम हरीराम प्रजापती (उरुळी कांचन), कल्पेश अशोक अग्रवाल (खडकी), आर्यन संजीव धोत्रे (वडारवाडी), अभिषेक अरुण चौबे, अरुण जगदंबा चौबे आणि अंकित अरुण चौबे (तिघे रा. नवी मुंबई) यांचा समावेश आहे.

सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक शामराव काळे यांनी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्यामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे ‘मकोका’चा प्रस्ताव सादर केला होता. पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.