Sudhir More : माजी नगरसेवक सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

138
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांच्या आत्महत्येप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एका महिले विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुधीर मोरे यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.
विक्रोळी पार्क साईड येथे राहणारे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, तसेच रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे (६२) यांचा मृतदेह गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घाटकोपर विद्याविहार दरम्यान हवेली पुलाखाली रेल्वे रुळावर मिळून आला होता. कुर्ला रेल्वे पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान शुक्रवारी दुपारी सुधीर मोरे यांच्या मुलगा समर (२७) याने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
ही महिला विक्रोळीत राहणारी असून एका मोठ्या पदावर असल्याचे कळते,  सुधीर मोरे (Sudhir More) यांचे मागील सात-आठ वर्षांपासून तिच्या सोबत मैत्रीपूर्ण सबंध होते, मोरे यांचा मुलगा या महिलेला मागील काही महिन्यांपासून ओळखत होता, या महिलेचा कॉल आल्यानंतर सुधीर मोरे तणावात येत असे अशी माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ती महिला मोरे यांना धमकी देऊन मानसिक त्रास देत होती असे समर याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सुधीर मोरे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.
गुरुवारी रात्री सुधीर मोरे यांनी पार्कसाईड येथील गणेश मंडळाची बैठक आटोपल्यानंतर ते थेट पार्कसाईड येथून रिक्षाने घाटकोपर रेल्वे स्थानकात आले. तेथून रेल्वे पादचारी पुलावरून फलाट क्रमांक २ वर आले, तेथून ते सीएसएमटीच्या दिशेने रुळावरून चालत हवेली उड्डाणपुलापर्यंत आल्याचे घाटकोपर रेल्वे स्थानकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दूल यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.