Home सत्ताबाजार Uddhav Thackeray Speech in Hindi : शिवसेनेने मराठी बाणा गुंडाळला ? वाचा...

Uddhav Thackeray Speech in Hindi : शिवसेनेने मराठी बाणा गुंडाळला ? वाचा काय झाले इंडिया आघाडीच्या बैठकीत…

37
Uddhav Thackeray Speech in Hindi : शिवसेनेने मराठी बाणा गुंडाळला ? वाचा काय झाले इंडिया आघाडीच्या बैठकीत...
Uddhav Thackeray Speech in Hindi : शिवसेनेने मराठी बाणा गुंडाळला ? वाचा काय झाले इंडिया आघाडीच्या बैठकीत...

इंडिया आघाडीची २ दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी २८ पक्षाचे ६५ नेते मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा या विषयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुहूर्तमेढ रोवली, त्या बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे हे शुक्रवारी १ सेप्टेंबर ला झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या यजमानपदी होते. त्या उद्धव ठाकरेंच्या समोर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे एम. के. स्टॅलिन यांनी बिनदिक्कतपणे तामिळ भाषेत भाषण केले; परंतु उद्धव ठाकरे यांनी मात्र हिंदी भाषेत भाषण करून बाळासाहेबांचे विचार बासनात बांधले, असे दिसून आले. (Uddhav Thackeray Speech in Hindi)

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : केंद्रसरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक)

पत्रकारांसमोर भूमिका मांडताना उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या भूमीवर असूनही हिंदी भाषेतून बोलले. (Uddhav Thackeray Speech in Hindi) विशेष म्हणजे या बैठकीसाठी हजर राहिलेले तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांचे संपूर्ण भाषण तमिळ भाषेतच केले. बैठकीत झालेले ठराव आदित्य ठाकरे यांनी इंग्रजी भाषेत मांडले. यापुढे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या रॅली देशभरात काढल्या जातील. त्याचसोबत जुडेगा भारत, जितेगा इंडिया या कॅम्पेनसाठी समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत इंग्रजी भाषेतून सर्वांना दिली.

स्टॅलिन हे महाराष्ट्राच्या भूमीत येऊन तमिळ भाषेत बोलतात; मात्र शिवसेनेने मराठीच्या संदर्भात ४ पावले मागे घेतल्याचे दिसून आले आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोरच मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा केला. त्यावरही मौनच बाळगले गेले. (Uddhav Thackeray Speech in Hindi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!