Hindu Rashtra : सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदु राष्ट्राविषयी मोठे वक्तव्य : वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत !

हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) आहे, हे सत्य आहे

145
Hindu Rashtra : सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदु राष्ट्राविषयी मोठे वक्तव्य : वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत !
Hindu Rashtra : सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदु राष्ट्राविषयी मोठे वक्तव्य : वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत !

“हिंदुस्थान हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) आहे आणि हे सत्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते करणार. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, काही लोकांना समजले आहे आणि काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ आहेत, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले आहे. ते नागपुरात दैनिक तरुण भारतच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

(हेही वाचा – Parliament : महिला विधेयक की वन नेशन वन इलेक्शन संसदेचे विशेष अधिवेशन : चर्चेचे गुऱ्हाळ)

भारतातील प्रत्येकाचा हिंदू संस्कृतीशी संबंध

मोहन भागवत पुढे म्हणले की, हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) आहे, हे सत्य आहे. आरएसएस हे नक्कीच करेल, अशी हिंदू समाजाची भावना आहे. आरएसएस हे नक्की करेल, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, यात काही आक्षेप नाही; पण सर्व भारतीयांची काळजी करा. आज जे भारतात आहेत, त्या प्रत्येकाचा संबंध हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमीशी आहे, इतर कोणाशी नाही. काही लोकांना हे समजले आहे, काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ राहतात आणि काही लोकांना स्वार्थामुळे समजून घ्यायचे नाही. काही लोक हे विसरले आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, आरएसएसला हिंदू आणि इतर सर्व गोष्टींची काळजी आहे.”

मोहन भागवत यांनी राष्ट्र निर्माणासाठी मीडियाला पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी माध्यमांनी समाजाला तयार केले पाहिजे, असे भागवत म्हणाले.

मीडियाने चांगल्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात – देवेंद्र फडणवीस

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांनी म्हटले की , जनमत तयार करण्यात मीडियाची मोठी भूमिका घेतली आहे. यासाठी चांगल्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. माध्यमांनी सामाजिक भान वाढवण्याचे चांगलं काम करायला पाहिजे.

सर्वसमावेशक विचारधारा ही वृत्तपत्रांची ओळख असायला हवी – नितीन गडकरी

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नितीन गडकरी म्हणाले की, “वृत्तपत्रे विचाराच्या आधारावर चालली पाहिजेत. ध्येय निश्चित केल्यानंतर काम करणे महत्त्वाचे आहे. सर्वसमावेशक विचारधारा ही वृत्तपत्रांची ओळख असायला हवी; पण जनतेला तेच माध्यम आवडते, ज्याची एक ठराविक विचारधारा असते.

(Hindu Rashtra)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.