Borivali : बोनेटवर केक, हवेत एअरगनने फायरिंग; वाढदिवसाचा जल्लोष पडला महागात!

बोरीवलीच्या गोराईत रस्त्यावर राडा; १० जण पोलिसांच्या ताब्यात

94
Celebration with cake cutting and airgun firing in Borivali.
Borivali : बोनेटवर केक, हवेत एअरगनने फायरिंग; वाढदिवसाचा जल्लोष पडला महागात!
  • प्रतिनिधी 

Borivali                   वाढदिवसाचा उत्साह चांगलाच अंगलट आल्याची घटना बोरीवली पश्चिमेतील गोराई-२ परिसरात घडली. रस्त्याच्या मध्यभागी इनोव्हा कार उभी करून तिच्या बोनेटवर केक कापण्यात आला. त्यानंतर एअरगनमधून हवेत फायरिंग करत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे. (Borivali)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरकुल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, सुविध्या स्कूलजवळ, गोराई-२ येथे हा प्रकार घडला. आकाश रामकृपाल गुप्ता (२६) याचा वाढदिवस असल्याने त्याने मित्रांना बोलावले होते. यावेळी इनोव्हा कार रस्त्याच्या मध्यभागी चुकीच्या पद्धतीने उभी करण्यात आली. त्यानंतर कारच्या बोनेटवर केक कापून वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. (Borivali)

(हेही वाचा – कोकणातील खारेपाटणच्या १० होतकरू विद्यार्थिनींना सायकल भेट; Dombivli च्या रोटरी क्लबची कर्तव्यपूर्ती)

दरम्यान, आकाश गुप्ता याने मित्रांना एकत्र करून बेकायदेशीर जमाव जमवल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांच्या आदेशाचा भंग केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या जल्लोषादरम्यान जतीन नविन शर्मा याने त्याच्या मालकीची बेबी एअरगन आणली होती. विजेश विजयप्रकाश उपाध्याय याने ही एअरगन बेदरकारपणे चालवून सार्वजनिक ठिकाणी फायरिंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हवेत फायरिंग करून सार्वजनिक शांतता भंग केल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली. (Borivali)

या प्रकरणी आकाश रामकृपाल गुप्ता (२६), जतीन नविन शर्मा (२६), विजेश विजयप्रकाश उपाध्याय (२६), विक्रम मांगीलाल चौधरी उर्फ टॉमची (२९), ऐश्वर्य मधुकर गोमणे (२६), अजिंक्य जयंत आढाव (२४), जय धर्मेंद्र कपाडिया (२७), रोहन जगदीश पाटील (२७), मुंकूंद आसाराम थोरवे (२५) आणि प्रशांत सुभाष हरिजन (२५) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस अधिकारी करीत आहेत. (Borivali)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.