अर्जुन उद्योग समुहाच्या प्रमुखांनी केली कुटुंबासह आत्महत्या

त्यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

210
अर्जुन उद्योग समुहाच्या प्रमुखांनी केली कुटुंबासह आत्महत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती संतोष शिंदे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने केली आत्महत्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष शिंदेंनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवार २३ जून २०२३ रोजी विष घेऊन तसेच गळ्यावर सुरी फिरवून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शिंदे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संतोष शिंदे यांनी अगदी अल्पावधीतच औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे नाव कमावले होते. त्यांच्या आत्महत्येने परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – केसीआरचे चिरंजीव दिल्लीत दाखल; अमित शहा, राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करणार)

दरम्यान, संतोष शिंदे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईट नोट लिहिली असून ती गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या मिळालेल्या चिठ्ठीमधून आत्महत्येचे खरे कारण समोर येईल. संतोष शिंदेंनी कोविड काळात सामाजिक बांधिलकी जपताना परप्रांतियांना मोठी मदत केली होती.

बेडरुममध्येच संपवले आयुष्य

शनिवारी २४ जून २०२३ रोजी सकाळी संतोष शिंदेंच्या बेडरुमचा दरवाजा न उघडल्याने त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडण्यास सांगितले असता, बेडरुममध्ये संतोष शिंदे, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची सुसाईड नोट सापडली आहे. सुरुवातीला त्यांनी विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी फिरवली. त्यांना एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याने तणावाखाली येऊन त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.