Karad Accident : भरधाव चारचाकीची ट्रकला धडक, बहीण-भावासह तिघांचा मृत्यू

कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे हा अपघात झाला.

28
Karad Accident : भरधाव चारचाकीची ट्रकला धडक, बहीण-भावासह तिघांचा मृत्यू
Karad Accident : भरधाव चारचाकीची ट्रकला धडक, बहीण-भावासह तिघांचा मृत्यू

 बंगळुरू महामार्गवरील कराडजवळ भीषण अपघात झाला. चार चाकी वाहनाने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बहीण भावाचा समावेश आहे.कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे हा अपघात झाला. (Karad Accident)

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. चारचाकी गाडी वेगात आली होती. मात्र पुढे असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने मागूनच गाडीने ट्रकला धडक दिली. त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली.

दरम्यान, या अपघातात अभिषेक जाधव,भारती जाधव आणि नितीन पोवार यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक आणि भारती जाधव हे दोघे भाऊ-बहीण होते. अभिषेक जाधव हा कोल्हापूर पोलिसात कार्यरत आहे. हे सर्वजण मुंबईला निघाले असताना हा भीषण अपघात झाला. (Karad Accident)

(हेही वाचा : Israel-Palestine Conflict : सौदी अरेबियाने इस्रायलसोबतची चर्चा थांबवली; युद्धाचा परिणाम )

अभिषेक जाधव,भारती जाधव आणि नितीन पोवार हे चारचाकी गाडीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी कराडजवळ पाचवड फाटा परिसरात आली. या चारचाकीचा वेग जास्त होता. त्याचवेळी समोर असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने आणि गाडीवर नियंत्रण न राहिल्याने ही गाडी जाऊन थेट ट्रकवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, चार चाकी वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण धडकेत चार चाकी गाडीतील तिघांचा मृत्यू झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.