Manoj Jarange Patil : “मी त्याच्या मागे लागलो तर त्याला सोडणार नाही…” जरांगे पाटलांकडून भुजबळांचा एकेरी उल्लेख

29
Manoj Jarange Patil : "मी त्याच्या मागे लागलो तर त्याला सोडणार नाही..." जरांगे पाटलांकडून भुजबळांचा एकेरी उल्लेख

मराठा समाजाला आरक्षण (Manoj Jarange Patil) मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आज म्हणजेच शनिवार १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. या सभेत मराठा समाजाला आरक्षण द्या, ही आता शेवटची मागणी आम्ही करत आहोत, दहा दिवसांत आरक्षण मिळाले नाही तर पुढे जे काही होईल, त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच त्यांनी यावेळी छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, तुमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही त्यामुळे आम्ही टीका करणे बंद केले. तुम्ही काल म्हणालात की सात कोटी खर्च आला आहे. येडपट आहे का? हे सगळं विकत नाही तर सभेसाठी भाड्याने घेतले आहे. 100 एकर… येवलीच्या शेतकऱ्याने आम्हाला फुकट दिले आहे. यावेळी भुजबळांचे नाव न घेता शेतकऱ्यांनी तुला जमीन दिली नाही पण मला दिली. दोन वर्षे जाऊन बेसन खाऊन आला आहे. ह्यांना ज्या मराठ्यांनी मोठे केले त्यांचेच पैसे मंत्र्याने खाल्ले आहे. मराठ्यांनी घाम गाळून सभेसाठी पैसे उभारले आहे.अजित पवार भुजबळांना समज द्या नाहीतर मी त्याच्या मागे लागलो तर त्याला सोडणार नाही.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : सौदी अरेबियाने इस्रायलसोबतची चर्चा थांबवली; युद्धाचा परिणाम )

मराठा समाज आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या

मनोज पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की; “कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाणपत्र दिली. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्यावतीने विनंती आहे की, सर्वांनी मिळून मराठा समाज आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्याचबरोबर ते म्हणाले की या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रासह राज्याने तातडीने निर्णय घ्यावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.